अक्कलकुवा l प्रतिनिधी
वीजबिल वसुलीच्या नावाखाली अक्कलकुवा तालुक्यातील वीजपुरवठा वारंवार खंडीत करण्यात येत आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणात मोठी अडचण निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर शेतातील पिके देखील संकटात सापडले आहे. या समस्येविरुद्ध भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील जनता दि. 1 नोव्हेंबर रोजी वीज वितरणच्या अक्कलकुवा कार्यालयात घेराव आंदोलन करणार आहे.
नागरिकांच्या सेवेसाठी शासकीय यंत्रणेमार्फत वीज पुरवठा केली जात असली तरी याच्या नावाने नागरिकांना अडचणी आणले जात आहे. याचा अनुभव अक्कलकुवा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकर्यांना नेहमीच येत आहे. विजेच्या या संकटातून शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी देखील सुटले नाही. विज पुरवठा करतांना अक्कलकुव्यातील वीज वितरणचे कर्मचारी नेहमीच मनमानी कारभार करतात. वसुलीच्या नावाखाली वीज पुरवठा खंडीत करीत नागरिकांना अडचणीत आणत आहे.
कोरोनाच्या संकटाने विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण केले, त्यांच्यावर ऑनलाइन शिक्षण लादले गेले. परंतु त्यातही वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे तेही संकटात सापडले आहे. वीज वितरणच्या या भूमिकेमुळे सर्वच घटक प्रभावित झाले. ही बाब संबंधित यंत्रणेच्या निदर्शनास आणून देण्यासाठी अक्कलकुवा कार्यालय येथे घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजपाचे अ.ज. सेलचे राज्य उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांना कळविले.








