Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वीज अनुदान सवलतीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

team by team
October 27, 2021
in राज्य
0
नंदुरबार l प्रतिनिधी
वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत वीज अनुदान योजनेचा लाभ घेत असलेले 27 अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेले यंत्रमाग सोडून अन्य नोंदणीकृत वस्त्रोद्योग प्रकल्पांनी वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी 3 नोव्हेंबर 2021 पर्यत प्रस्ताव सादर करावे. असे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले यांनी केले आहे.
वस्त्रोद्योग प्रकल्पांनी वीज सवलत सुरु असलेल्या, बंद असलेल्या तसेच नवीन वीज अनुदान सवलतीचा प्रस्ताव आयुक्त (वस्त्रेाद्योग) यांच्या संकेतस्थळावर सादर करावा. प्रस्तावासोबत मागील 6 महिन्याचे वीज देयक, प्रकल्पाचा एकूण वीज वापर जसे औद्योगिक, कामगार, वसाहतचे कार्यालय व अन्य वापर, वीज मिटरची माहिती सादर करावी. विहीत मुदतीत ज्या प्रकल्पांचे प्रस्ताव प्राप्त होणार नाहीत त्यांची वीज सवलत बंद करण्यात येईल. वीज सवलतीचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावांची तपासणी  करण्यात येईल. त्यानंतर शासनाच्या मान्यतेने सदर प्रकल्पांना वीज सवलत लागू करण्यात येईल.
वीज सवलतींच्या प्रस्तावात सादर केलेली माहिती तसेच प्रकल्पात प्रत्यक्षात असलेल्या माहितीची विभागाच्या दक्षता व नियंत्रण पथकाकडून नियमित तपासणी करण्यात येईल. तपासणीत सादर केलेल्या माहितीमध्ये तफावत असल्यास वीज सवलत तसेच अन्य सवलती तात्काळ बंद करण्यात येतील तसेच यापूर्वी दिलेल्या सर्व अनुदानाची व्याजासह वसूली करण्यात येईल.
ज्या प्रकल्पांनी 22 ऑक्टोंबर 2021 च्या शासन निर्णयातील परिशिष्टाप्रमाणे यापूर्वी माहिती सादर केलेली आहे. ती माहिती वगळून उर्वरित माहिती सादर करावी. तसेच स्वघोषणापत्र न सादर केल्यामुळे वीज सवलत बंद आहे त्यांनी देखील प्रस्ताव सादर करावे, असे प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा येथील वीज वितरणच्या कार्यालयात भाजपाचे 1 नोव्हेंबर रोजी घेराव आंदोलन

Next Post

वीजबिल रोखीने भरण्यासाठी आता दरमहा पाच हजार रुपयांची मर्यादा

Next Post

वीजबिल रोखीने भरण्यासाठी आता दरमहा पाच हजार रुपयांची मर्यादा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add