शहादा | प्रतिनिधी-
कोविड १९ मुळे सर्वदूर लॉकडाऊन असले तरी थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे जिल्ह्यासह बाहेराज्यातून पर्यटक गर्दी करत असून तोरणमाळकडे कोणीही जावू नये,असे म्हसावद पोलीसांकडून कळवण्यात आले असून नियमांचे ऊल्लंघन केल्यास गुन्हा दाखल होवून कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगीतले.
नंदुरबार जिल्ह्यात जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांच्या आदेशान्वये कोणतेही पर्यटन स्थळ अजूनपर्यंत खुले करण्यात आलेले नसून जिल्ह्यातून पर्यटक येत आहेत.कोरोना नियमांचे कोणतेही पालन न करता बाहेर राज्यातूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने बंद असलेल्या तोरणमाळसारख्या कोरोनामुक्त ठिकाणी कोरोना पसरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याकरीता म्हसावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी तोरणमाळ येथे कोणीही येवू नये. नियमांचे ऊल्लंघन केल्यास याबाबत कठोर कार्यवाही होणार असल्याचे कळवले आहे.