नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा येथील अवंतीका फाऊंडेशनतर्फे “अवंतीका राज्य पुरस्कारासाठी” आलेल्या प्रस्ताव आणि सामाजिक कार्याचा अहवाल व तसेच सोशल मीडियाद्वारे माहिती प्राप्त करुन सामाजिक कार्यकर्त्यांना अवंतीका राज्य पुरस्कार 20-2021 साठी निवड जाहीर करण्यात आले आहेत. दि.31 ऑक्टोंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
अवंतीका फाऊंडेशनतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.यात अनंत खैरनार ,नाशिक (क्षेत्र :कला) यांना पद्मश्री व्ही.एस .गायतोंडेपुरस्कार 2021, हिरालाल पाटील,जवखेडा, शहादा (क्षेत्र: कृषी)
कृषीरत्न पुरस्कार 2021,जगदिश पटेल, सुरत (क्षेत्र:पर्यावरण) वनश्री पुरस्कार 2021, श्रीमती नंदीनी जाधव,पुणे (क्षेत्र : सामाजिक) सावित्री गौरव पुरस्कार 2021, निलेश पाटील ,नवापूर (क्षेत्र : पत्रकारिता ) बाळशास्री जांभेकर सर्वोकृष्ठ पत्रकारिता पुरस्कार 2021, चेतन पन्हेर ,नाशिक (क्षेत्र :सामाजिक) म.ज्योतिबा फुले पुरस्कार 2021, प्रतीक शुक्ल ,पुणे (क्षेत्र :सामाजिक ) बाबा आमटे पुरस्कार 2021, दिपक सोनवणे, मुंबई (क्षेत्र :सामाजिक) म.ज्योतिबा फुले पुरस्कार 2021, आप्पा अनारसे ,पुणे (क्षेत्र: सामाजिक)डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्कार 2021, केदारेश्वर प्रतिष्ठाण आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार 2021 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.यात अवंतीका फाऊंडेशनच्या मानाच्या विशेष
समाज वैभव पुरस्कार 2021 चे मानकरी शहादा येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक शाम जाधव
यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच कोविड 19च्या प्रादुर्भाव काळात उकृष्ठ कामिगीरी करणाऱ्यांचा अवंतीका कोविड योद्धा2021सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
वरील सर्व पुरस्कार मानकरींनी दि.31ऑक्टोंबर 2021 ,रविवारी रोजी दु.2 वा होटेल शेरे पंजाब हॉल, शहादा जि.नंदुरबार येथे उपस्थित राहुन पुरस्कार स्विकारावा असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा पल्लवीताई प्रकाशकर, सचिव विशाल कुलकर्णी, संयोजक भुषण थेटे, जिल्हाध्यक्ष निलेश पाटिल, यांनी केले आहे. कार्यक्रमाचे आयोजन सर्व पदाधिकारी व सदस्य अवंतीका फाऊंडेशन ,शहादा हे करीत आहेत.








