Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जि.प.उपाध्यक्ष व दोन सभापतींची आज निवड

team by team
October 24, 2021
in राजकीय
0
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान

नंदुरबार | प्रतिनिधी

 

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमानुसार नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व दोन विषय समिती सभापतींचे रिक्त पद भरण्यासाठी उद्या दि.२५ ऑक्टोबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार व शहादा उपसभापती निवडीत महाविकास आघाडी एकत्र आल्याचे चित्र आहे.त्यामुळे पोटनिवडणूकीनंतर आता उपाध्यक्ष व सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

नंदुरबार जि.प.तील ११ सदस्यांचे ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन सदस्यत्व रद्द झाले होते. यामुळे या गटातील सदस्यत्वासाठी नव्याने पोटनिवडणूक घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. मात्र कोरोनामुळे सदरची निवडणूक लांबणीवर पडली. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये सदर निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल देखील बदलले आहे. सन २०१९ मध्ये जि.प. निवडणूक झाल्यानंतर त्यात भाजपा व कॉँग्रेसच्या प्रत्येकी २३ तर शिवसेनेच्या ७ व राष्ट्रवादीचे ३ सदस्य निवडून आले होते. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर भाजपाच्या ७, कॉँग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी २ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. पोटनिवडणूकीनंतर भाजपाचे ४, कॉँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी ३ तर राष्ट्रवादीचा १ सदस्य विजयी झाला आहे. यामुळे आता नंदुरबार जि.प.मध्ये सद्यस्थितीत कॉँग्रेस सर्वाधिक २४, भाजपा २०, शिवसेना ८ तर राष्ट्रवादी ३ असे पक्षीय बलाबल आहे. दरम्यान, आज जि.प.उपाध्यक्ष व दोन विषय समिती सभापतींच्या निवडीसाठी विशेष सभा होणार आहे. यामुळे नेमके उपाध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा ऍड.राम रघुवंशी यांच्या गळ्यात पडते की अन्य काही? तसेच विषय समिती सभापतीपदी कोणाची वर्णी लागते? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.जि.प.च्या विषय समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादीतर्फे ही मागणी करण्यात आली आहे.त्यामुळे सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागुन आहे. नंदुरबार व शहादा उपसभापती निवडीत महाविकास आघाडी एकत्र आल्याचे चित्र आहे. नंदुरबार येथे कॉग्रेसच्या उमेदवाराला शिवसेनेने मतद केली.तर शहादा येथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतली होती.

 

बातमी शेअर करा
Previous Post

एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजी प्रायव्हेट लिमीटेड कंपनीची एअर फोर्सतर्फे विमानतळासंबधीत संरक्षण विषयक उपक्रमासाठी निवड

Next Post

अखेर नवापूर शहरात धुमाकुळ घालनारा पिसाळलेल्या घोडा जेरबंद

Next Post
अखेर नवापूर शहरात धुमाकुळ घालनारा पिसाळलेल्या घोडा जेरबंद

अखेर नवापूर शहरात धुमाकुळ घालनारा पिसाळलेल्या घोडा जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add