नंदुरबार l प्रतिनिधी
पूणे येथील एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजी प्रायव्हेट लिमीटेड कंपनीची एअर फोर्सतर्फे विमानतळासंबधीत संरक्षण विषयक उपक्रमासाठी निवड झाली आहे. हा उपक्रम एअरपोर्टवर राबवण्यात येत असून त्यामूळे संरक्षण क्षेत्रात एक्सलंसियाची विशेष ओळख निर्माण झाली आहे.
एक्सलंसिया कंपनीने या आधीही संरक्षण क्षेत्राशी निगडीत उपक्रमात भाग घेवून यशस्वीरीत्या कामगीरी पार पाडली आहे. याबाबत कंपनीचे संचालक विजय बोरसे यांनी सांगितले की, हा आमच्यासाठी मानाचा तूरा असून अशा प्रकारच्या कठीण आणी आव्हानात्मक कामगिरीसाठी एक्सलंसियाची टिम नेहमीच उत्सूक असते व यापूढेही एक्सलंसीयाची घोडदौड अशीच सूरू राहील.
एक्सलंसिया कंपनी इ लर्निंग, ॲनिमेशन व इंडस्ट्रीअल डिझाईन या क्षेत्रात अग्रगण्य कंपनी असून नासा, आयशर व्हॅाल्वो , भारत फोर्ज, टाटा ब्लूस्कोप, किर्लोस्कर आदी नामांकीत कंपन्यांसाठी उच्च तंत्रज्ञान व सेवा पूरवते. ग्रामिण भागातील तरूणांना उच्च तंत्रज्ञानातील नोकऱीचा वाव मिळावा व पूण्या मूंबईच्या तरूणांच्या बरोबरीने स्वताचे करीयर करावे यासाठी सामाजिक जाणीवेने एक्सलंसियाने नंदूरबार येथे कार्यालय स्थापीत केले आहे.
एक्सलंसियाच्या व्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता बोरसे व संचालक विजय बोरसे यांनी एक्सलंसिया डिफेंस टिमचे विशेष अभिनंदन केले.