Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

team by team
September 28, 2026
in राजकीय
0
गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

नंदुरबार l प्रतिनिधी-

अनंत चतुर्दशीनिमित्त नंदुरबार शहरात निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर रस्त्यांवर साचलेला तब्बल २२ टन गुलाल पालिकेच्या स्वच्छता विभागाने संकलित करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात डम्पिंग केला. मिरवणुका संपताच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासूनच स्वच्छता मोहीम हाती घेतली. तब्बल १२५ स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने चार ट्रॅक्टरद्वारे गुलाल संकलित करण्यात आला, तर अग्निशमन दलाच्या दोन पाण्याच्या बंबांनी गुलालाने माखलेले रस्ते पाण्याने धुऊन काढण्यात आले.

नंदुरबार शहरात २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्या अंतिम टप्प्यातील मिरवणुका उत्साहात पार पडल्या. विविध गणेश मंडळांकडून मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर गुलालाची उधळण करण्यात आली. त्यामुळे मिरवणूक मार्गावरील अनेक रस्त्यांवर गुलालाचे थर साचले होते.

गुलालामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन नगराध्यक्ष सौ. रत्ना रघुवंशी यांनी पालिकेच्या स्वच्छता विभागाला मिरवणूक संपताच रस्ते स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्वच्छता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने मोहीम सुरू केली.

माळीवाडा, मुस्लिम वस्ती परिसर, टिळक रोड, गणपती मंदिर परिसर, जळका बाजार, मंगळ बाजार, सुभाष चौक, अमृत चौक, शिवाजी रोड, देसाईपुरा, सोनी विहीर परिसर यासह मिरवणूक मार्गावरील विविध ठिकाणी साचलेला गुलाल ट्रॅक्टरमध्ये भरून संकलित करण्यात आला. संकलित केलेला सुमारे २२ टन गुलाल घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात नेऊन डम्पिंग करण्यात आला.

गुलाल संकलनाबरोबरच रस्त्यांवरील उर्वरित गुलाल व धूळ हटविण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन बंबांद्वारे पाण्याचा मारा करण्यात आला. मिरवणूक संपल्यानंतर मध्यरात्रीच अनेक प्रमुख रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. काही भागांमध्ये सकाळीही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शहरातील प्रमुख मिरवणूक मार्ग तुलनेने स्वच्छ दिसून आले.

 

 

१२५ कर्मचाऱ्यांची यंत्रणा

गुलाल संकलन व रस्ते स्वच्छतेसाठी पालिकेच्या सुमारे १२५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. चार ट्रॅक्टरच्या सहाय्याने गुलाल गोळा करण्यात आला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन बंबांद्वारे रस्ते धुऊन स्वच्छ करण्यात आले. मिरवणुकीनंतर तातडीने स्वच्छता केल्याने नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न पालिकेने केला.

बातमी शेअर करा
Previous Post

दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर डॉ. विजयकुमार गावित यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

Next Post

ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

Next Post
ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

September 28, 2026
सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी  निवड

सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी निवड

September 28, 2026
ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

September 28, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

September 28, 2026
दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर डॉ. विजयकुमार गावित यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर डॉ. विजयकुमार गावित यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

September 28, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत दुष्काळी उपाययोजना लागू

नंदुरबार जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत दुष्काळी उपाययोजना लागू

September 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add