Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सोशल मीडियावर तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला अटक

team by team
August 6, 2026
in क्राईम
0
सोशल मीडियावर तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला अटक

 

 

नंदुरबार l प्रतिनिधी-

 

सोशल मीडियावर हातात तलवार घेऊन व्हिडिओ प्रसारित करत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका तरुणाला नंदुरबार शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केले. आरोपीच्या ताब्यातून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच भारतीय हत्यार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या सूचनेनुसार नंदुरबार शहरात गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. त्याच मोहिमेअंतर्गत १ ऑगस्ट रोजी नंदुरबार शहर पोलिसांना हलवाई गल्ली परिसरात एक तरुण हातात तलवार घेऊन फिरत असल्याची तसेच त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची गोपनीय माहिती मिळाली.

 

माहितीची खातरजमा करत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. तपासात त्याची ओळख कासीम मुस्ताक हलवाई (वय २७, रा. बोडगाव, ता. जि. नंदुरबार) अशी पटली. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली.

 

याप्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ तसेच भारतीय हत्यार अधिनियम, १९५९ च्या कलम ४/२५ अन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

ही कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोलीस हवालदार जगदीश पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल रुपेश पगारे, राजेंद्र कटके, ललित गवळी, निंबा वाघमोडे आणि अमित भरवाड यांच्या पथकाने केली.

 

दरम्यान, नंदुरबार शहरात विनापरवानगी फिरणारे हद्दपार आरोपी तसेच चोरीचा माल बाळगणाऱ्यांविरुद्धही विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

 

 

 

बातमी शेअर करा
Previous Post

कॉलेज परिसरात तलवार व कुकरी बाळगून फिरणारा इसम जेरबंद

Next Post

नंदुरबार आगार येथे राजमाता जिजाऊ नवीन बसेसचे लोकार्पण

Next Post
नंदुरबार आगार येथे राजमाता जिजाऊ नवीन बसेसचे लोकार्पण

नंदुरबार आगार येथे राजमाता जिजाऊ नवीन बसेसचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add