Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

team by team
July 31, 2026
in राजकीय
0
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी-

भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना देण्यात आले आहे.
निवेदनात, माजीमंत्री आमदार विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबद्दल विजय चौधरी यांनी अपशब्द वापरल्याच्या ऑडिओ क्लिप सध्या जिल्ह्यातील समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये लोकप्रतिनिधींबद्दल अपशब्द वापरल्याने त्यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, माजी सभापती हेमलता शितोळे, प्रकाश चौधरी, भाजपाचे प्रदेश सदस्य अविनाश माळी, अॅड. चारुदत्त कळवणकर, अनिल भामरे, नगरसेवक पंकज चौधरी, आकाश चौधरी, संतोष वसईकर, अॅड. प्रकाश भोई यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.

पक्षातील पदावरुन काढण्याची मागणी

जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले. विजय चौधरी यांनी अनुचित शब्दांचा प्रयोग व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये केला आहे. यामुळे पक्षाची शिस्त ऐरणीवर आली आहे.

यापार्श्वभूमीवर वरिष्ठांनी तातडीने त्यांना पक्षातून काढावे, अशी मागणी केली.

विजय चौधरींवर गुन्हा दाखल

जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून समाज माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या कथेत ऑडिओ क्लिपमुळे वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. एका ऑडिओ क्लिप मध्ये भाजपाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या बद्दल अनुचित संभाषण करण्यात आल्याने भाजपाचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजय चौधरी यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

Next Post

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

Next Post
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना: जिल्ह्यातील 3 हजार 444 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना: जिल्ह्यातील 3 हजार 444 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add