नंदुरबार l प्रतिनिधी-
पथराई ता. नंदुरबार येथील के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय पथराई येथे कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय लष्करी इतिहासातील विजयांपैकी सर्वात महत्त्वाचा असलेला हा विजय २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस म्हणून सैनिकी शाळेत साजरा
करत युध्दात बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शरद पाटील होते. तसेच मंचावर सैनिक निर्देशक एन.आर. बागुल, पी बी .मोरे व पठाण सर उपस्थित होते .सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते अमर जवान स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
त्यानंतर एन.आर. बागुल यांनी कारगिल युद्धातले सैनिकांचे अतुलनीय शौर्य कधीही न विसरता येण्यासारखे असून ते नेहमीच सर्वांना प्रेरणा देणारे आहे असे मत व्यक्त केले.
कारगिल युद्ध प्रसंगांविषयी सांगताना कारगिलच्या अनेक उंच शिखरांवर पाकिस्तान सैन्यांनी कब्जा केला होता त्या भीषण परिस्थितीत भारतीय सैन्याने पाकिस्तान सैन्याचा कसा पराभव केला हे त्यांनी सांगितले. तसेच कॅप्टन विजय बत्रा व मनोज पांडे यांच्या अतुलनीय शौर्या विषयी माहिती दिली. प्राचार्य शरद बागुल यांनी सुद्धा कारगिल युद्धाचे प्रसंग सांगताना आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सैनिकांची प्रेरणा घेऊन एन डी ए परीक्षा पास होऊन अधिकारी बनावे असा मनोदय व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती करेले यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण निदेशक नरेंद्र बागुल , प्रवीण मोरे यांनी केले.








