Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

team by team
July 17, 2026
in राजकीय
0
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

नंदुरबार l प्रतिनिधी-

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व भाविक, वारकरी आणि पालख्यांच्या वाहनांना महाराष्ट्र शासनाने मोठी सवलत दिली आहे. वारीच्या कालावधीत भाविकांचा प्रवास सुलभ आणि अडथळामुक्त व्हावा यासाठी शासनाने 6 जुलै 2026 ते 29 जुलै 2026 या पंढरपूरला जातेवेळी व परतीच्या प्रवासाच्या कालावधीत संपूर्ण टोल माफी जाहीर केली आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात पथकर माफीच्या विनामूल्य पास आणि स्टीकर्सचे वाटप सुरू करण्यात आले असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

शासनाच्या परिपत्रकानुसार, हा टोल माफी पास केवळ पंढरपूरला जातानाच नव्हे, तर वारी संपवून परत येण्याच्या परतीच्या प्रवासासाठी देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे. दिनांक 06 जुलै ते 29 जुलै, 2026 (जातीचा व परतीचा प्रवास) या कलावधीत टोल माफी असून जिल्ह्यातील व शहरातील सर्व पोलीस ठाणे, वाहतूक विभाग, किंवा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदुरबार येथे पास मिळतील. हे पास आणि स्टीकर्स मागणीप्रमाणे पूर्णपणे विनामूल्य (मोफत) उपलब्ध करून दिले जात आहेत.

वारी कालावधीत सर्व पथकर (टोल) नाक्यांवर कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि टोल माफी सवलतीचा लाभ विनाअडचण घेता यावा, यासाठी सर्व भाविकांनी आणि वाहनधारकांनी आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यातून, वाहतूक विभागातून किंवा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदुरबार येथून आपले विनामूल्य पास त्वरित प्राप्त करून घ्यावेत, असेही आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

Next Post

राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

Next Post
राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

राणीपूर येथे दोन दिवसीय 'प्लांट जेनेटिक रिसोर्सेस' जागरूकता कार्यक्रम उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add