नंदुरबार l प्रतिनिधी-
का. वि. प्र. संस्था, भालेर अंतर्गत श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व द फ्युचर स्टेप स्कूल, भालेर येथे एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
ध्वजारोहण नववीची विद्यार्थिनी कल्याणी मगरे हिने ८८.६६% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे, सालाबादप्रमाणे तिच्या आई सौ.जयश्रीताई व वडील श्री. जितेंद्र मगरे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलचे ध्वजारोहण दुसरीची विद्यार्थिनी मनस्वी पाटील हिच्या आजी श्रीमती सुलोचना पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, सचिव भिका पाटील, संचालक देविदास पाटील, बी. के. पाटील, वासुदेव पाटील, रमेश पाटील, अभिमन पाटील तसेच पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर वर्गनिहाय विद्यार्थ्यांना निकालाचे वाटप करण्यात आले तसेच पालकांना उत्तरपत्रिका दाखविण्यात आल्या. विद्यार्थ्यांना बिस्किटे वाटप करण्यात आले. नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पालकांना शाळा पूर्व तयारी मेळाव्याची व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली.








