Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

team by team
April 28, 2026
in राजकीय
0
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

नंदुरबार l प्रतिनिधी-

‘जनम जनम का नाता है गौ हमारी माता है’, ‘गौमतेला राष्ट्रमाता घोषित करा’ अश्या घोषणांचा गजरात शेकडो गौभक्त यांच्या उपस्थितीत भव्य गौसन्मान रॅलीमध्ये सहभागी झाले. रॅली दादावाडी जैन मंदिरापासून सुरू होऊन गिरीविहार गेट ते तहसील कार्यालयात समारोप करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्या मार्फत हजारो स्वाक्षरींचे निवेदन संत, महंत, कथाकार यांनी दिले.यावेळी गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबा सहभागी झाल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

 

 

रॅलीचे सुरुवात गौमाता आणि नंदीबाबा तसेच गौसन्मान प्रार्थना पत्रांचे विधिवत पूजन करुन करण्यात आले. पिठाधीश पू. उध्दव महाराज, भागवताचार्य अविनाश महाराज जोशी, प्रकाशपुरी महाराज, वसंत चैतन्य महाराज, अनिल महाराज, गौभक्त डॉ नरेंद्र पाटील यांनी पूजन केले. वेदमंत्र पठन प्रमोद जोशी महाराज यांनी केले. हजारो स्वाक्षरींचे निवेदन ऐका लाल कापडमध्ये ठेऊन घोडा बग्गीवर रॅलीत सहभागी करण्यात आले.

रॅलीत प्रधानस्थानी गौमाता, नंदी बाबा, संत, महंत, कथाकार यांचे मागे मातृशक्ती व शेकडो गौभक्त सहभागी झाले होते. रॅलीत नवापूर येथील आदिवासी भजनी मंडळाने गौमतेचे भजन गायिले. जनम जनम का नाता है गौ हमारी माता है, बंद करो बंद गौहत्या बंद करो, गॊमाता को राष्ट्र माता घोषित करो, लाना होगा लाना होगा गौहत्या बंदी कानून लाना होंगा अश्या घोषणा देण्यात आल्या. रॅलीचा समारोप तहसील कार्यालयात झाल्यावर पू उद्धव महाराज, भागवताचार्य अविनाश महाराज यांनी उपस्थित गौभक्त यांना गौमाता राष्ट्र माता करण्यासाठी काय प्रयत्न करावे याविषयी संबोधित केले.

प्रशासनाचा वतीने नंदुरबार तहसीलदार प्रदीप पवार यांनी सर्व गौभक्तांचा भावनांचा आदर राखत स्वतः कार्यालयाचा बाहेर येऊन सर्व गौभक्त संत, महंत आणि शेकडो गौभक्त यांच्या हस्ते निवेदन स्वीकारले . यावेळी डॉ नरेंद्र पाटील यांनी निवेदनातील मागण्या संदर्भात प्रशासनाला अवगत केले. भारतातील ५५०० तालुक्यात २७ एप्रिल रोजी गौसन्मान रॅलीचे आयोजन केले आहे.निवेदनात गौमाता राष्ट्र माता घोषित करणे, केंद्रीय गोसेवा आणि संरक्षण कायदा’ लागू करून देशातील सर्व कत्तलखान्यांचे परवाने रद्द करावे, स्वतंत्र केंद्रीय गौ मंत्रालय स्थापन करावे या मागण्या करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यावेळी नंदुरबार तालुक्यातील संत, महंत, गौरक्षक, गौभक्त यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक रॅलीत सहभागी झाले होते.

 

बातमी शेअर करा
Previous Post

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

Next Post

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

Next Post
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add