Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

team by team
April 26, 2026
in राजकीय
0
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

नंदुरबार l प्रतिनिधी-

माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली संसद रत्न माजी खासदार डॉ हिना गावित यांच्या हस्ते शहादा येथील बांधकाम कामगारांना भांडे संच वितरित करण्यात आले. दरम्यान या कार्यक्रमात डॉक्टर गावित यांच्या छायाचित्राचे टी-शर्ट परिधान करून काही कामगार अनोख्या भावनिक बांधिलकीचे दर्शन घडवताना दिसले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने या भांडेसंचाचे वितरण करण्या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील, कामगार कल्याण मंडळ विभागातील भरत गवळे यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थिताना मार्गदर्शन करताना डॉक्टर हिना गावित भाषणात म्हणाल्या की, महाराष्ट्र सरकार वंचित घटकांसाठी विविध योजना राबवत आहे केंद्रातील मोदी सरकार देखील महिलांना आणि कामगार व मजुरांना विविध सोयी सवलती देणाऱ्या योजना राबवत आहे. त्या सर्व योजना प्रत्येक गावातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचाव्यात यासाठी आपले नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार तथा सर्वांचे लाडके नेते डॉक्टर विजयकुमार गावित हे कायमच प्रयत्नशील राहिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज आपल्याला घरकुल योजनांसह भांडे संच वाटपासारख्या योजनांचा लाभ मिळत आहे. कागदपत्रांची योग्य ती पूर्तता करून प्रत्येक गरजूने लाभ घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी डॉक्टर हिना गावित यांनी केले.

कामगारांनी घडवले अनोख्या भावनिक बांधिलकीचे दर्शन

दरम्यान, भांडे संच वाटप केले जात असताना काही कामगार आणि काही तरुण आवर्जून डॉक्टर विजयकुमार गावित यांचे छायाचित्र छापलेले टी-शर्ट परिधान करून आलेले पाहायला मिळाले. विद्यमान स्थितीत डॉक्टर विजयकुमार गावित हे मुंबई येथे रुग्णालयात उपचार घेत असले तरी टी-शर्ट वरील छायाचित्राच्या माध्यमातून तसेच पत्रकावर छापलेल्या चित्राच्या माध्यमातून डॉक्टर विजयकुमार गावित यांची उपस्थिती जाणवून देताना दिसले. डॉक्टर गावित साहेबांमुळेच प्रभावीपणे योजना राबवली जात असून लहान लहान गावांना रस्ते घरकुल वगैरे त्यांच्यामुळे मिळत असल्याची प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी व्यक्त केली. डॉक्टर गावित यांच्या बद्दल अनोखी भावनिक बांधिलकी यातून सर्वांना पाहायला मिळाली.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

Next Post
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add