Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

team by team
April 26, 2026
in Uncategorized
0
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

नंदुरबार l प्रतिनिधी-

विसरवाडी परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत आरोपीकडून सुमारे ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. २४ एप्रिल २०२६ रोजी विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील फिर्यादी सरनाबाई गावीत (रा. खडकी, ता. नवापूर) यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने संमतीशिवाय कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी भा.दं.सं. कलम ३०५(अ), ३३१(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी विसरवाडी येथील नागपूर–सूरत राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखाली थांबलेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तात्काळ सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले.

चौकशीत संशयितांनी आपले नाव अमित भामट्या गावीत (वय २०, रा. खडकीपाडा, ता. नवापूर) असे सांगितले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली. त्याच्याकडून एकूण ५३ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ८ हजार ५०० रुपये रोख रक्कम असा एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांवळे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश वसावे तसेच पथकातील कर्मचारी यांनी ही कामगिरी पार पाडली. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास विसरवाडी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी जयेश खलाणे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

Next Post
नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add