धडगाव l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील अस्तंभा येथे अश्वत्थामा ऋषींची यात्रा दि . १ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे . यात्रेसाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोरोना नियमांचे पालन करुन अस्तंभा ऋषींचे भाविकांना दर्शन घेता येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला .
यात्रेच्या नियोजनाबाबत पोलिस बंदोबस्तासाठी पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले . यावेळी अक्राणी तहसीलदार ,धडगाव पोलिस निरीक्षक , मोलगी पोलिस निरीक्षक , सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्यासह मोलगी पोलिस पाटील आंबीलाल वसावे , तलाठी मानसिंग वळवी , ग्रामसेवक बारक्या पाडवी , ग्रामसेवक व्ही.पी. नगार , उपसरपंच वनसिंग वळवी , फोज्या वळवी , धिरसिंग वळवी , किरण वळवी , कालूसिंग वसावे , बावा वळवी , रुपजी वळवी , तुंबड्या वळवी , राशा वळवी , निमा वळवी , रमेश वळवी , मालसिंग वळवी , पिसा वळवी , भिका वळवी , माधव वळवी , वसंत वळवी ,दिलीप वळवी , ॲड . गौतम वळवी व ग्रामस्थ उपस्थित होते . सदर नियोजन बैठकीत बाहेरील व्यापारी वर्गास मनाई , सोंगाड्या पार्टी , तमाशा पार्टीस मनाई , कोरोना नियमांचे पालन करुन दर्शनास परवानगी , सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे , विना मास्क असलेल्यांना दर्शनास परवानी देण्यात येणार नसल्याचे ठरविण्यात आले . तसेच अस्तंभा येथे पोलिस बंदोबस्त लावून जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या .








