Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

team by team
February 20, 2026
in राज्य
0
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार येथील एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयमध्ये शिवजयंतीनिमित्त सांस्कृतिक, शैक्षणिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले.

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या प्रसंगी नंदुरबार तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी चौरे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती सोहळ्याचा औपचारिक प्रारंभ झाला.

विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी अभिमान आणि राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या या कार्यक्रमाला शिक्षक, कर्मचारी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनकार्याचा वेध घेणारी प्रभावी सादरीकरणे केली. वैष्णवी कदम या विद्यार्थिनीने अभ्यासपूर्ण व ओघवत्या भाषेत शिवरायांवरील आपले विचार मांडत उपस्थितांना प्रेरित केले. त्यानंतर प्रज्ञा पावरा हिने सादर केलेल्या जोशपूर्ण शिवगर्जनेने सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

मृणाली भामरे हिने जिजाऊंच्या जीवनावर आधारित सादर केलेल्या एकपात्री प्रयोगातून मातृसंस्कारांचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित केले. यानंतर गटशिक्षणाधिकारी चौरे साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग उदाहरणादाखल सांगत शौर्य, नेतृत्व, शिस्त, स्वावलंबन व राष्ट्रनिष्ठा हे गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरला तो पावनखिंड प्रसंगावर आधारित नाट्यप्रयोग. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या नाट्यात बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचे जिवंत चित्रण करण्यात आले. थरारक संवाद, प्रभावी अभिनय व नेपथ्यामुळे प्रेक्षकांना इतिहासाचा साक्षात अनुभव मिळाला.

कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी “राज आलं, राज आलं, जिंकूनिया…” या गीतावर सादर केलेल्या समूह नृत्याने कार्यक्रमात रंगत भरली. याशिवाय स्वसंरक्षणासाठी लाठी संचालनाचे प्रात्यक्षिक वैष्णवी कदम हिने सादर केले. मर्दानी खेळाच्या या सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक थक्क झाले.

या प्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या नूतनवर्षा वळवी यांनी विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील आदर्श गुण अंगीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षक मीनल वळवी, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक छोटू बोरसे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद दीक्षित यांनी केले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिशा सोनवणे, गायत्री पाटील, रचिता सुतार, अपर्णा पाटील, रोजलीन यंगड आदींनी विशेष परिश्रम घेतले.
शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारा हा शिवजयंती उत्सव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा
Previous Post

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

Next Post

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

Next Post
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026
माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

April 13, 2026
नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

April 13, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add