नंदुरबार l प्रतिनिधी-
बनारस येथील विद्यापीठात शिकणाऱ्या धडगाव तालुक्यातील रहिवासी असलेल्या युवा कारणे प्रक्षोभक व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध नंदुरबार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, सार्वजनिक शांतता भंग होईल अशा प्रकारचे व्हिडीओ प्रसारित केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, धडगाव तालुक्यातील बोरवण येथील युवकाने २१ सप्टेंबर रोजी बनारस येथून त्याच्या युट्यूब चॅनेलवर एका घटनेसंदर्भातील माहिती पूर्णपणे जाणून न घेता त्यावर प्रक्षोभक पद्धतीचा व्हिडीओ तयार केला होता. तो प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल केला होता. त्यास अटक करून दोन दिवसांची पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांवर आतापर्यंत सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलिस दलाने याबाबत केलेल्या आवाहनानुसार, एखाद्या घटनेची पूर्ण आणि सत्य माहिती जाणून घेऊनच प्रतिक्रिया द्यावी. आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक व्हिडीओ, मेसेज व्हायरल करून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्यास संबधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार येत आहे.पोलिस दलाच्या सायबर सेलचे अशा बाबतीत बारकाईने लक्ष असल्याचेही पोलिस