Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अस्तंबा यात्रेतील मृतांना राज्य सरकारने दहा लाखाची मदत जाहीर करावी, खासदार गोवाल पाडवी व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी

team by team
October 20, 2025
in राजकीय
0
अस्तंबा यात्रेतील मृतांना राज्य सरकारने दहा लाखाची मदत जाहीर करावी, खासदार गोवाल पाडवी व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी

अस्तंबा यात्रेतील मृतांना राज्य सरकारने दहा लाखाची मदत जाहीर करावी, खासदार गोवाल पाडवी व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हयातील सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या अस्तंबा ऋषर्षीची यात्रा करुन घरी परतत असतांना, झालेल्या भिषण अपघातामध्ये नंदुरबार तालुक्यातील 8 मयतांना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत जाहीर करण्याबाबतची मागणी खासदार ऍड.गोवाल पाडवी व नंदुरबार विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

नंदुरबार जिल्हयातील धडगांव तालुक्यात सातपुडा पर्वत रांगेत अस्तंबा येथे दरवर्षी दीपोत्सवानिमित्त धनत्रयोदशीला 4 ते 5 दिवस अश्वत्थामा ऋषींची यात्रा भरत असते. येथे महाराष्ट्र राज्यतुन तसेच गुजरात व मध्यप्रदेश या राज्यातुन हजारोंचा संख्येने भावीक अश्वत्थामा ऋषींच्या दर्शनासाठी यात्रेत येत असतात, धनत्रयोदशींचा दिवशी सकाळी 10 वाजेचा दरम्यान अस्तंबा येथुन भावीक दर्शन घेऊन परतत असतांना चांदसैली घाटात पिकअप वाहनाचा भिषण अपघात झाला व त्या अपघातात नंदुरबार तालुक्यातील पवन गुलाब मिस्तरी, राहुल गुलाब मिस्तरी, चेतन पावबा पाटील, भुषण राजेंद्र गोसावी, रामेश्वर छगन धनगर सर्व रा. घोटाणे तसेच योगेश लक्ष्मण ठाकरे, हिरालाल जगन भील, रा. कोरीट व संजय भिलाव रा. नंदुरबार या 8 तरुणांचा जागीच मृत्य झाला. या अपघातामुळे मृतांचा कुटुंबांवर दुखांचा डोंगर कोसळला असून, घरातील कर्ता पुरुष गेल्याने आर्थिक संकट देखील कुटूंबावर आले आहे.

त्या अनुषंगाने नंदुरबार लोकसभेचे खासदार ऍड. गोवाल पाडवी नंदुरबार विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. नंदुरबार जिल्हयातील सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या अस्तंवा ऋषींची यात्रा करुन घरीत परतत असतांना झालेल्या भिषण अपघातामध्ये मरण पावलेल्या 8 मयत भावीकांना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत जाहीर करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

Next Post

बनारस येथे शिकणाऱ्या धडगाव तालुक्यातील युवकाविरुद्ध प्रक्षोभक व्हिडिओ तयार केल्याप्रमाणे गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add