नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील का . वि .प्र .संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी जिल्हा क्रीडा स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात उंच उडी स्पर्धेत प्रियंका सुरेश वळवी या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त केला.
तसेच २०० मीटर धावणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळून विभागाला तिची निवड झालेली आहे त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष भास्करराव हिरामण हिरामण पाटील ,संस्थेचे कार्याध्यक्ष विजय बोरसे, संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील , मुख्याध्यापक पी .एस. सूर्यवंशी, पर्यवेक्षक पी .डी. पाटील तसेच विद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका सौ. एस .पी .पाटील, क्रीडा शिक्षक एस. एस. पाटील सर यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.