Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दरा प्रकल्पाच्या पाईप ड्रिस्ट्रीब्युशन योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूद करणार : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

team by team
October 6, 2025
in राजकीय
0
दरा प्रकल्पाच्या पाईप ड्रिस्ट्रीब्युशन योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूद करणार : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नंदुरबार l प्रतिनिधी

मध्यम प्रकल्पातील पाणी पाईप ड्रिस्ट्रीब्युशन सिस्टीमद्वारे थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी अंदाजे 13 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यासाठी प्रयत्नशील असून लवकरच या संदर्भात जलसंपदा मंत्री व सचिव स्तरावर बैठक आयोजित करण्यात येईल, असे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीदरम्यान पालकमंत्री कोकाटे यांनी तत्काळ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाशी संपर्क साधत, दरा प्रकल्पासाठी आवश्यक निधीची तरतूद करून देण्याची मागणी केली. शहादा तालुक्यातील दरा मध्यम प्रकल्पाला आज 20 वर्षे पूर्ण झाली असून, हा प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. सध्या या प्रकल्पात तब्बल 500 एमसीएफटी इतका पाणीसाठा असूनही पाटबंधारे व्यवस्था नसल्याने या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना होऊ शकत नाही. परिणामी, मोठ्या प्रमाणात सिंचनाची संधी वाया जात आहे.

या बैठकीस आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस., निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल पाटील यांच्यासह कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री कोकाटे यांनी सांगितले की, या विषयावर शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी आणि संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसह लवकरच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीतून प्रकल्पासाठी आवश्यक निधी मंजूर करून, साठलेले पाणी पाईप सिस्टीमद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

या उपक्रमामुळे शहादा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना थेट सिंचनाचा लाभ मिळून, दरा प्रकल्पाचा उपयोग खऱ्या अर्थाने कृषी विकासासाठी होईल, अशी अपेक्षा पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली.

 

बातमी शेअर करा
Previous Post

पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

Next Post

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रियंका वळवीचे घवघवीत यश

Next Post
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रियंका वळवीचे घवघवीत यश

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रियंका वळवीचे घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add