सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर जिल्हा दौऱ्यावर
नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौरा कार्यक्रम याप्रमाणे आहे.
गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर, 2025 रोजी अकोला ते नंदुरबार दरम्यान विविध शासकीय रुग्णालयांची पाहणी करत नंदुरबारकडे प्रयाण. सोईनुसार शासकीय विश्रामगृह नंदुरबार येथे आगमन व राखीव.
शुक्रवार, दिनांक 12 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 08.00 वाजता हॉटेल बाबा रिसॉर्ट, नंदुरबार येथे खासदार, आमदार व स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांचेसमवेत चर्चा. 09.00 वाजता हॉटेल बाबा रिसॉर्ट, नंदुरबार येथून शासकीय वाहनाने ग्रामीण रुग्णालय, मोलगी तालुका अक्कलकुवाकडे प्रयाण. 11.00 वाजता ग्रामीण रुग्णालय, मोलगी येथे भेट व पाहणी. दुपारी 12.30 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र रोषमाळ खु., तालुका धडगाव, येथे भेट व पाहणी तसेच तरंगता दवाखाना डोमखेडी बोट पॉइंटला भेट व पाहणी. 02.00 वाजता ग्रामीण रुग्णालय, धडगाव येथे भेट व पाहणी. 02.30 वाजता शासकीय विश्रामगृह धडगाव, येथे आगमन व राखीव. सायंकाळी 04.00 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र बिलगाव, तालुका धडगाव, येथे भेट व पाहणी. 04.45 वाजता तरंगता दवाखाना, भुषा बोट पॉईंट, तालुका धडगांव येथे भेट व पाहणी. 07.00 वाजता उपजिल्हा रुग्णालय, तळोदा, येथे भेट व पाहणी. रात्री 08.45 वाजता शासकीय विश्रामगृह नंदुरबार, येथे आगमन व राखीव.
शनिवार, दिनांक 13 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 08.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथून शासकीय वाहनाने जिल्हा महिला शासकीय रुग्णालय नंदुरबारकडे प्रयाण. 09.00 वाजता जिल्हा महिला शासकीय रुग्णालय, नंदुरबार येथे भेट व पाहणी 09.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे आगमन व नंदुरबार जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाकडील विविध विषयांचा आढावा. 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथून शासकीय मोटारीने धुळेकडे प्रयाण करतील, असे शासकीय दौऱ्यानुसार कळविण्यात आले आहे.








