Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बाल क्रांतीकारांना शहीद दिनानिमित्त केले अभिवादन

team by team
September 10, 2025
in राजकीय
0
बाल क्रांतीकारांना शहीद दिनानिमित्त केले अभिवादन

बाल क्रांतीकारांना शहीद दिनानिमित्त केले अभिवादन

नंदुरबार l प्रतिनिधी-

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या बाल शहिदांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करीत माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी भावपूर्ण मानवंदना दिली.

दरवर्षी 9 सप्टेंबरला हुतात्मा दिवस साजरा केला जातो. त्यानुसार दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी शहीद स्मृती समिती आणि जिल्हा पोलीस दल यांच्यावतीने शहरातील व जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत सामूहिकपणे ही मानवंदना देण्यात आली. शहीद स्मृति समितीचे अध्यक्ष एडवोकेट रमाबाई शहा, निंबाजीराव बागुल, कीर्ती भाई सोलंकी, प्राध्यापक राजेंद्र शिंदे, अभिजीत सरोदे, संदीप चौधरी यांच्यासह राजकीय सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महात्मा गांधींनी इंग्रजांना “चले जाव’चा इशारा दिल्यानंतर ९ सप्टेंबर १९४२ ला नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभातफेरी नेतृत्व शिरीष कुमार मेहता, शशिधर केतकर, लालदास शाह, धनसुखलाल वाणी आणि घनश्यामदास शाह यांनी केले. मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली. पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. या बालकांनी ते आवाहन झुगारले आणि “भारत माता की जय’, “वंदे मातरम्‌’चा जयघोष सुरूच ठेवला. अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबारात हे पाच बाल क्रांतिकारक हुतात्मा झाले होते. त्यांच्या बलिदानाला ८३ वर्षे पूर्ण होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर जिल्हा दौऱ्यावर

Next Post

डॉ. हिना गावित यांनी झाडाझडती घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी सुरू केले शेतकऱ्यांना युरिया वाटप

Next Post
डॉ. हिना गावित यांनी झाडाझडती घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी सुरू केले शेतकऱ्यांना युरिया वाटप

डॉ. हिना गावित यांनी झाडाझडती घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी सुरू केले शेतकऱ्यांना युरिया वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add