नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्ह्यातील 639 ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाचे आरक्षण 01 जुलै, 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृहात काढण्यात येणार असल्याची माहिती, उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) प्रमोद भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील 563 आणि अनुसूचित क्षेत्राबाहेरील 76 ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश असून हे आरक्षण पुढील पाच वर्षांच्या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका होऊन गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी लागू राहील, असेही श्री. भामरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.