Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवविवाहित युवकाचा खुनाची सीबीआय चौकशी व्हावी; रघुवंशी समाजाचे निवेदन

team by team
June 6, 2025
in राजकीय
0
नवविवाहित युवकाचा खुनाची सीबीआय चौकशी व्हावी; रघुवंशी समाजाचे निवेदन

नवविवाहित युवकाचा खुनाची सीबीआय चौकशी व्हावी; रघुवंशी समाजाचे निवेदन

नंदुरबार l प्रतिनिधी

इंदूर येथील नवविवाहित युवकाचा हत्येचा अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय महापरिषदेचा वतीने निषेध करण्यात आला असून, त्यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करून प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत रघुवंशी समाजाच्या शिष्टमंडळाने आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मिताली सेठी यांना निवेदन दिले आहे. २२ मे ते २३ मे २०२५ रोजी इंदूर येथील नवविवाहित राजा रघुवंशी आणि त्यांच्या पत्नी श्रीमती सोनम रघुवंशी यांचे शिलॉंग (मेघालय)येथून काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अपहरण केले होते. त्यानंतर नवविवाहित राजा रघुवंशी यांची हत्या करण्यात आली. घटनेनंतर सोनम रघुवंशी यांचे अपहरण करण्यात आले.त्यांच्या अजून पर्यंत थांगपत्ता लागलेला नसून, जीवाला धोका निर्माण झाला आहे. जवळच बांगलादेश सीमा असल्यामुळे मानवी तस्करीची शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

अपहरण झालेल्या सोनम रघुवंशी यांच्या शोधार्थ त्यांचे भाऊ दीपक रघुवंशी सहकाऱ्यांसह शिलॉंग येथे गेले आहेत त्यांना देखील गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून धमक्या देण्यात आल्या. या घटनेमुळे रघुवंशी समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

निवेदनातील मागण्या

नवविवाहित युवक राजा रघुवंशी यांच्या हत्येची तात्काळ सीबीआय चौकश करावी. मारेकऱ्यांना अटक व्हावी. श्रीमती सोनम रघुवंशी यांच्या सुरक्षित परतीसाठी त्वरित आणि प्रभावी शोध सुरू करावा. सोनम रघुवंशी यांच्या शोधात सहभागी असलेल्या त्यांच्या भाऊ दीपक रघुवंशी व सहकाऱ्यांना पुरेशी सुरक्षा पुरवावी.

यांची होती उपस्थिती

निवेदन देण्याप्रसंगी आ.चंद्रकांत रघुवंशी,किशोर रघुवंशी, विलास रघुवंशी,निखिल रघुवंशी,रवींद्र परदेशी,पुष्पेन्द्र रघुवंशी,संदीप रघुवंशी,आनंद रघुवंशी,इंग्रजीत रघुवंशी,महेश रघुवंशी,दिनेश परदेशी,महेश परदेशी,गजेंद्र रघुवंशी,सागर रघुवंशी,सुनील रघुवंशी,विनोद रघुवंशी,महेंद्र रघुवंशी,संतोष परदेशी,संतोष परदेशी,सुनील रघुवंशी,शैलेंद्र रघुवंशी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

अवकाळीमुळे 122 घरांची पडझड, वीज पडून युवकाचा मृत्यू,डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते कुटुंबीयांना चार लाखाचा धनादेश

Next Post

अंत्योदय व प्राधान्य कुंटूंब योजनेतील लाभार्थ्यांना,20 जून पर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक

Next Post
अवैधरित्या रेशनचा तांदूळ परराज्यात काळया बाजारात विक्रीला जात असताना पोलिसांचा छापा, तीन ट्रकांसह 54 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अंत्योदय व प्राधान्य कुंटूंब योजनेतील लाभार्थ्यांना,20 जून पर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add