Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अवकाळीमुळे 122 घरांची पडझड, वीज पडून युवकाचा मृत्यू,डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते कुटुंबीयांना चार लाखाचा धनादेश

team by team
June 6, 2025
in राजकीय
0
अवकाळीमुळे 122 घरांची पडझड, वीज पडून युवकाचा मृत्यू,डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते कुटुंबीयांना चार लाखाचा धनादेश

नंदुरबार l प्रतिनिधी-

तालुक्यातील शनिमांडळ तलवाडे आखतवाडे आणि लगतच्या गावांमध्ये 5 जून 2025 च्या रात्री वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे आणि शेतीचे नुकसान झाले. महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री यांनी आज तातडीने भेट देऊन त्या सर्व नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि ग्रामस्थांना मदत मिळवून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केला त्याचबरोबर ग्रामस्थांचे सांत्वन देखील केले.

नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ तलवाडे, आखातवाडे, खर्दे भागात काल सायंकाळी व रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घरांसह शेती पिकाच मोठा नुकसान झाले आहे. याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर आज ६ जून रोजी दुपारी चार च्या सुमारास राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी या नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी मांडळच्या मंडळ भागातील एकूण 122 घरांची पडझड झाली तसेच खर्दे खुर्द येथे वादळी पावसाच्या दरम्यान निलेश मन्साराम भिल नामक व्यक्तीचा मृत्यू झाला तर दिनेश बन्सीलाल भिल हा तरुण जखमी झाला आहे. खरदेखुर्द येथील अंगणवाडी चे सर्व पत्रे उडाले आहेत अशी माहिती देण्यात आली. पडलेली घरे, उडालेले पत्रे तसेच नुकसान झालेल्या वाहनांची शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या कडे केली. तसेच पावसामुळे शेती पिकाचा नुकसान झाला असून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई पंचनामे करून मिळावी अशी मागणी केली.

प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पाटील वैंदाणे गावचे सरपंच डॉ मनोज गिरासे तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार नितीन पाटील महावितरण चे अधिकारी कार्यकारी अभियंता अतुल गायधनी उप कार्यकारी अभियंता अशोक पाटील कृषी विभागाचे अधिकारी तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते. या सर्व पाहणीनंतर आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी तलाठी ग्रामसेवक तसेच कृषी अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाला देण्यासंदर्भात सूचना केल्या.

यावेळी खर्दे येथे मरण पावलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना चार लाखाची मदत याप्रसंगी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते देण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

महावितरणचा वर्धापन दिन म्हणजे सामाजिक बांधिलकीचे उदाहरण : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

Next Post

नवविवाहित युवकाचा खुनाची सीबीआय चौकशी व्हावी; रघुवंशी समाजाचे निवेदन

Next Post
नवविवाहित युवकाचा खुनाची सीबीआय चौकशी व्हावी; रघुवंशी समाजाचे निवेदन

नवविवाहित युवकाचा खुनाची सीबीआय चौकशी व्हावी; रघुवंशी समाजाचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add