नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील लक्कडकोट येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
नवापूर तालुक्यातील लक्कडकोट येथील ३५ वर्षीय महिला सोमवारी सकाळी शेतात काम करत असताना त्याठिकाणी त्यांचा पती किरण त्रिंब्या गावित (४५) गावित हा आला होता. यावेळी त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घालण्यास सुरुवात केली. या वादादरम्यान किरण याने पत्नीला ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केला. त्यापासून बचाव करण्यासाठी महिलेने दोन्ही हात पुढे केले असता, मनगटांवर गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी जखमी पत्नीने नवापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून किरण गिब्या गावित (४५) याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करत आहेत.