नंदुरबार l प्रतिनिधी
धनगर,भटके विमुक्त,ओ.बी.सी.,बारा बलुतेदार या समाजाच्या वेग-वेगळ्या जातींच्या कल्याणांचा योजना, आर्थिक उन्नतीची महामंडळे,कल्याणकारी शासन निर्णय घेण्यात आली आहेत.समाजाने शिवसेनेशी घट्ट जुळवून विकास साध्य करून घ्यावा असे प्रतिपादन ओबीसी, व्हीजेएनटी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांनी केले.
उपमुख्यमंत्री,शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होत असलेल्या शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक भाग म्हणून ओबीसी,व्हीजेएनटी सेनेचे (शिवसेना) प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे संवाद दौऱ्याच्या निमित्ताने नंदुरबार येथे आले असता त्यांनी आमदार कार्यालयात शिवसैनिकांची बैठक गुरुवारी घेतली.यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी केले.
प्रसंगी प्रदेशाध्यक्ष किसवे म्हणाले,विकासाच्या आणि कल्याणाच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करून शिवसेना पक्ष आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा लोक हिताचा विचार समाजात समजून सांगणे आणि ओ.बी.सी, व्हि. जे. एन. टी. समाजातील सर्व जातीतील जनता शिवसेनेशी घट्ट जुळावी या व्यापक उद्देशाने राज्यातील संपूर्ण जिल्हयात विशेषतः ओबीसी व्हीजेएनटी बहुल मतदार संघात संघटनात्मक दौरा करून पक्ष बांधणी मजबुत करण्यात येत आहे.
जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी म्हणाले, शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अनेक विकासाच्या योजना राबविण्यात आल्या. त्यांच्या जनकल्याणकारी योजनांमुळेच महायुती सत्तेत आली. जिल्ह्यातील शिवसैनिकांनी योजनांच्या लाभ लोकांपर्यंत पोहोचवावा.
बैठकीला शेतकी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ज्योती राजपूत,माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी सभापती विक्रमसिंह वळवी, अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हाध्यक्ष परवेज खान,माजी जि.प सदस्य देवमन पवार,तालुका प्रमुख डॉ.सयाजीराव मोरे,माजी सभापती कैलास पाटील,
युवती सेना जिल्हाप्रमुख राजश्री मराठे, माजी नगरसेवक रवींद्र पवार,माजी नगरसेवक गजेंद्र शिंपी,जगन माळी, उपजिल्हाप्रमुख कृष्णदास पाटील, हिरालाल चौधरी, मोहितसिंग राजपूत,महानगरप्रमुख विजय माळी, बाजार समिती संचालक किशोर पाटील,ठाणसिंग राजपूत,शिवसेना संघटक राजेश वसावे,माजी पं.स सदस्य सुनील वसावे,प्रल्हाद राठोड,कमलेश महाले,तेजस पवार आदी उपस्थित होते.