Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहरातून अवैध मद्यासह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

Mahesh Patil by Mahesh Patil
May 6, 2025
in क्राईम
0
नंदुरबार शहरातून अवैध मद्यासह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार l प्रतिनिधी

अवैध दारूच्या वाहतूकीवर नंदुरबार शहर पोलिसांनी कारवाई करीत एकुण 05 लाख 39 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार शहरातील कंजरवाडा कडे जाणाऱ्या रोडाकडुन एक इसम विदेशी दारुचा माल लाल रंगाच्या चारचाकी वाहनातुन घेऊन जात आहे, अशी खात्रीशीर गुप्त माहिती मिळालेवरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी शहर पोलीसांचे पथकास बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी सांगितले.

मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने शहर पोलीसांचे पथक हे कंजरवाडा परिसरातील गौतम नगर परिसरात थोड्या अंतरावर येऊन थांबले असता तेथे काही वेळाने एक लाल रंगाची चारचाकी वाहन कंजरवाड्याकडुन येतांना दिसले, सदर गाडीचा पोलीस पथकाने पाठलाग करुन गाडी यशवंत विदयालय परिसरात अडविली असता सदर लाल रंगाचे टाटा कंपनीचे वाहन ( क्र.एम.एच.41, व्ही.0742 )  हिचेवरील चालक विजयसिंग रामसिंग नाईक रा. केरवा, खांडबारा, ता. नवापुर जि. नंदुरबार तसेच त्याचे सोबत पंकज प्रकाश चौधरी संताजी चौक, खांडबारा, ता. नवापुर जि. नंदुरबार अशांना गाडीमध्ये काय आहे. बाबत विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले.

सदर गाडीची तपासणी करता त्यामध्ये विदेशी दारुचे बॉक्स मिळुन आले. त्याबाबत नमुद इसमांना मालाची परवानगी आहे काय बाबत विचारणा करता त्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी नसलेबाबत कळविले. सदर कारवाईत एकुण 5 लाख 39 हजार 200 रुपये किमतीचा विदेशी दारु तसेच वाहन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात शहर पोलीसांना यश मिळाले असून आरोपींविरुध्द शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं.284/2025 महा. दारुबंदी कायदा कलम 65 (अ) (ई), 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, सपोनि रविंद्र बागुल, पोउपनि  स्वप्नील पाटील, पोहेकों भटु धनगर, सुनिल वाकडे, पोकों राहुल पांढारकर, भगवान मुंडे, हरेश कोळी, किरण मोरे, मपोकों निंबाबाई वाघमोडे अशांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी कविता चंद्रशेखर पाटील यांची बिनविरोध निवड

Next Post

बारा बलुतेदार समाजाने शिवसेनेशी जुळवून विकास साध्य करावा : प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे

Next Post
बारा बलुतेदार समाजाने शिवसेनेशी जुळवून विकास साध्य करावा : प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे

बारा बलुतेदार समाजाने शिवसेनेशी जुळवून विकास साध्य करावा : प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कृउबास सभापतीपदी दीपक मराठे तर उपसभापती विजय पाटील बिनविरोध

कृउबास सभापतीपदी दीपक मराठे तर उपसभापती विजय पाटील बिनविरोध

June 21, 2025
जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम

जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम

June 21, 2025
मोदीजींच्या प्रेरणेमुळेच जगभरात योगाभ्यास सुरू झाला : डॉ. हिना गावित यांचे वक्तव्य

मोदीजींच्या प्रेरणेमुळेच जगभरात योगाभ्यास सुरू झाला : डॉ. हिना गावित यांचे वक्तव्य

June 21, 2025
तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन

तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन

June 17, 2025
जिल्ह्यात 25 हजार विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सवात उत्साहात स्वागत

जिल्ह्यात 25 हजार विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सवात उत्साहात स्वागत

June 17, 2025
राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला

June 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group