नंदुरबार l प्रतिनिधी-
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने अत्यावश्यक सुरक्षा संच व गृहपयोगी वस्तुंचे (भांडे संच) वितरण केले जाणार असून आहे. त्या नोंदणीचा शुभारंभ महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे लाडके नेते आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आला. वंचित राहिलेल्या ग्रामस्थांनी व नागरिकांनी नोंदणीचा लाभ घ्यावा तसेच विरोधकांच्या भूलथापांना आणि अफवांना कोणीही बळी पडू नये असे आवाहन याप्रसंगी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले.
राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार हे आर्थिक दृष्ट्या गरीब असतात. पैशांसाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्रातील युती सरकारने कामगार विभागाकडील नोंदीत कामगारांना विविध खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी आर्थिक सहाय्य देणाऱ्या योजना सुरू केल्या आहेत. त्या अंतर्गतच गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने अत्यावश्यक सुरक्षा संच व गृहपयोगी वस्तुंचे वितरण केले जात असून गावागावातील ग्रामस्थ गृहपयोगी भांडे संचांचा लाभ घेताना दिसले आहेत.
आता पुन्हा ते वाटप सुरू केले जाणार असून वंचित राहिलेल्या कामगारांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या नोंदणीचा शुभारंभ महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे लाडके नेते आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आला. वंचित राहिलेल्या ग्रामस्थांनी व नागरिकांनी नोंदणीचा लाभ घ्यावा तसेच विरोधकांच्या भूलथापांना आणि अफवांना कोणीही बळी पडू नये असे आवाहन याप्रसंगी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले. भारतीय जनता पार्टीचे शेखर पाटील प्रवीण पाटील आणि अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते.