Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चावी बनविण्याच्या बहाण्याने दागिने चोरी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात

team by team
April 28, 2025
in क्राईम
0
चावी बनविण्याच्या बहाण्याने दागिने चोरी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील आष्टी येथे एकाच्या कपाटातून चाबी बनवणाऱ्या इसमाने सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दितील फिर्यादी भास्कर श्रावण आंधळे, रा. आष्टे, ता.जि. नंदुरबार यांचे दि.10/03/2025 रोजी त्यांच्या कपाटाची चावी बनविणा-या इसमाने कपाटातुन सोन्याचे दागिने चोरुन नेले म्हणुन तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 102/2025 भा.न्या.सं. कलम 305 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना दिनांक 24/04/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा एकता नगर परिसरात राहणारा सराईत संशयित आरोपी सुतारसिंग शिकलीकर याने केला आहे व तो सध्या सुरत शहरात उधना येथे फिरत असुन पुढे कोठेतरी पळून जाण्याची शक्यता आहे, बाबत खात्रीशीर बातमी मिळालेवरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला कारवाई करणेकामी सुचना केल्या.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाकडून सुतारसिंग शिकलीकर याचा सुरत शहरातील उधना येथील प्रभु नगर परिसरात शोध घेत असतांना तो पथकास मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सुतारसिंग जलसिंग शिकलीकर, वय 32 वर्षे, रा. एकता नगर, नंदुरबार असे सांगितले. त्यास विश्वासात घेऊन नमुद गुन्हयाबाबत विचारपूस करता त्याने सदरचा केला असल्याची कबुली दिली आहे.

त्याअन्वये वर नमुद आरोपीकडुन एकुण 1 लाख 5 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन तालुका पोलीस ठाणे गुरनं. 102/2025 हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. सदर ताब्यातील आरोपीला तालुका पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, तसेच पोहेकॉ मुकेश तावडे, बापु बागुल, विशाल नागरे, पोशि अभय राजपुत, शोएब शेख, रामेश्वर चव्हाण अशांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील मृतकांना राष्ट्रवादीने वाहिली श्रद्धांजली

Next Post

भांडे संच वाटप पुन्हा सुरू होणार; माजी मंत्री आ.डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते नोंदणीचा झाला शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add