नंदुरबार l प्रतिनिधी-
उमर्दे खुर्द ता. नंदुरबार येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तनी सप्ताह सुरुवात झाली असून येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात पंच अग्नी आखाड्याचे महंत सोमेश्वरानंदजी ब्रह्मचारी यांच्या आशीर्वादाने व ह. भ .प .आनंदराव महाराज बोरकुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली २० डिसेंबर रोजी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तने सप्ताह सुरुवात झाली २७ डिसेंबर रोजी बोरकुंडकर महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होईल .त्यानंतर ग्रामस्थ तर्फे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनदिन कार्यक्रम पहाटे पाच ते सहा काकड आरती , ज्ञानेश्वरी पारायण सकाळी -नऊ ते ११ व दुपारी तीन ते पाच, हरिपाठ- सायंकाळी सहा ते सात ,कीर्तन- रात्री नऊ ते ११. कार्यक्रमात मृदुंगाचार्य म्हणून- बाळा महाराज कंक्राळेकर गायनाचार्य म्हणून -गवरलाल महाराज खंडलाय,
साहेबराव महाराज हट्टीकर,हार्मोनियम- रमेश कुटे व दत्तू पेटकर उमरदेकर आधी सेवा देणार आहेत. भजनी मंडळाचा सहभाग… विखरण, कलमाडी, सिंदगव्हाण, वडवद, भालेर, चौपाळे, रजाळे निंभेल, मोहिदा(क.स .) रांजणी, असाणे आदी गावातील भजनी मंडळ सहभागी होते. कार्यक्रमाचे आयोजक ह.भ.प.भजनी मंडळ ह.भ.प.ज्ञानेश्वर भजनी मंडळ, भातोजी महाराज, भजनी मंडळ, स्वाध्याय परिवार, स्वामी समर्थ मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, महाराणा प्रताप मित्र मंडळ, श्रीराम मित्र मंडळ आदीचे सप्ताहात सहकार्य लाभणार आहे.