Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हि.गो.श्रॉफ हायस्कुलमध्ये गणित दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी मांडले 95 उपकरणे

team by team
December 23, 2024
in शैक्षणिक
0
हि.गो.श्रॉफ हायस्कुलमध्ये गणित दिनानिमित्त  विद्यार्थ्यांनी मांडले 95 उपकरणे

नंदुरबार | प्रतिनिधी –

येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कुलमध्ये थोर गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीच्या पार्श्‍वभुमीवर गणित दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणितीय उपकरणांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.

थोर भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दिवस दरवर्षी २२ डिसेंबर रोजी गणित दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. त्या पार्श्‍वभुमीवर येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कुलमध्ये गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भामरे ॲकेडमीचे संचालक युवराज भामरे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा शाह होत्या. व्यासपिठावर पर्यवेक्षिका सिमा पाटील, पर्यवेक्षक भिकू त्रिवेदी उपस्थित होते.

 

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात येवून श्री. रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शाळेतील गणित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गणितावर आधारीत विविध उपकरणे, यंत्रे तयार केली होती. या उपकरणांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन युवराज भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी प्रदर्शनातील उपकरणांची पाहणी करुन विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली. या उपकरणांचे परिक्षण श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.विमलेश बागुल व प्रा.कमलेश अहिरे यांनी केले.

 

यावेळी युवराज भामरे यांनी सांगितले, गणित हा विषय सोपा आहे, परंतू विद्यार्थ्यांकडून त्यांचा बाऊ केला जावून तो विषय कठीण वाटू लागतो. परंतू अशा गणितीय प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना गणिताबाबतची भिती दूर होण्यास मदत होणार असून शाळेतूनही अनेक रामानुजन तयार होवू शकतात, असे सांगितले.

 

मुख्याध्यापिका सौ.सुषमा शाह यांनी सांगितले, थोर गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांनी गणिताबाबतचे कुठलेही प्रशिक्षण घेतले नव्हते. तरीही त्यांनी गणितीय विश्लेषण, संख्या सिद्धांत, अनंत मालिका आणि अपूर्णांक यामध्ये भरीव योगदान दिले. तसेच त्यांच्या काळात न सुटलेल्या गणितांच्या समस्यांवर देखील त्यांनी उत्तरे शोधली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गणितामध्ये आवड निर्माण करुन अशाचप्रकारे शोधकवृत्ती जोपासावी, असे आवाहन केले.

 

शाळेतील संगीत शिक्षिका सौ. अनघा जोशी व त्यांच्या चमूने ‘ नाच रे गणिता आमच्या मनात ‘ हे गणित गीत सादर केले. फलक लेखन चित्रकला शिक्षक महेंद्र सोमवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यार्थिनी वृंदा गवळी आणि हिमांशी बडगुजर यांनी केले. प्रास्ताविक नेहा पाटील व प्रसाद चौधरी यांनी केले. सर्व गणित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उपकरणे बनविण्यासाठी मार्गदर्शन केले.  आभार उपशिक्षक सुनिल गिरासे यांनी मानले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व गणित शिक्षकांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी निवडसाठी 29 डिसेंबर रोजी ईच्छुकांच्या मुलाखती

Next Post

उमर्दे खुर्द येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तनी सप्ताहास सुरुवात

Next Post
उमर्दे खुर्द येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तनी सप्ताहास सुरुवात

उमर्दे खुर्द येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तनी सप्ताहास सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add