Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्य टेनिक्वाईट स्पर्धेत नंदुरबार संघ उपविजेता, मयुर पाटीलची महाराष्ट्र संघात निवड

team by team
November 29, 2024
in राज्य
0
राज्य टेनिक्वाईट स्पर्धेत नंदुरबार संघ उपविजेता, मयुर पाटीलची महाराष्ट्र संघात निवड

नंदुरबार l प्रतिनिधी-

पंढरपूर येथे होणार्‍या राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघ सहभागी झाला होता. यात नंदुरबार जिल्हा टेनिक्वाईट संघटनेच्या मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले. या संघातून कर्णधार मयूर पाटील याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशनच्या मान्यतेने व सोलापूर टेनिक्वाईट असोसिएशनच्यावतीने ४१ वी ज्युनिअर गट राज्य टेनिक्वाईट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन पंढरपूर येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्याचा संघ सहभागी झाला. या संघात मुलांमध्ये मयुर पाटील (कर्णधार), किरण मराठे, हर्षल मराठे, दिव्यांशू मोरे, समाधान माळी, पृथ्वीराज पाटील यांचा समावेश होता. या संघाने उत्कृष्ट खेळाचे कामगिरी करत महाराष्ट्र राज्यात द्वितीय स्थान प्राप्त केले असून या संघातून कर्णधार मयूर पाटील याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

चेन्नई येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेत मयूर पाटील महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. खेळाडूंच्या यशाबद्दल नंदुरबार जिल्हा संघटनेचे अध्यक्ष पंकज पाठक यांनी खेळाडूंना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी डी.आर.हायस्कूलचे पर्यवेक्षक हेमंत खैरनार, विपुल दिवाण, संघटनेचे सचिव डॉ.मयूर ठाकरे, क्रीडाशिक्षक जगदीश बच्छाव, निलेश गावित, स्वप्नील लांबोळे, प्रशिक्षक राकेश चौधरी, पी.एम.पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

मूलभूत कर्तव्य पार पाडल्याशिवाय संविधानाचा उद्देश पूर्ण होऊ शकत नाही. – प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी

Next Post

शनि अमावस्यानिमित्त शनिमांडळ येथे शनि देवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Next Post
शनि अमावस्यानिमित्त शनिमांडळ येथे  शनि देवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शनि अमावस्यानिमित्त शनिमांडळ येथे शनि देवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add