Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ.हिना गावित यांच्या पाठपुराव्यामुळे ड यादीतील 68 हजार 496 जणांना घरकुलांचा होणार लाभ

team by team
September 21, 2024
in राजकीय
0
डॉ.हिना गावित यांच्या पाठपुराव्यामुळे ड यादीतील 68 हजार 496 जणांना घरकुलांचा होणार लाभ

नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. हिना गावित यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांची ड यादी मंजूर झाली आहे. डॉ. हिना ताई गावित यांच्या या प्रयत्नामुळे ड यादीतील 68 हजार 496 लोकांची घरकुल मंजूर झाली आहेत.

अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी खासदार असताना तळागाळातील गोरगरिबांना दिलेले लाभ स्मरणीय म्हणावे असेच आहे. नंदूरबार क्षेत्रात डॉ. हिना गावित यांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचविण्याचे काटेकोरपणे प्रयत्न केले. तथापि अनेक बेघर ग्रामस्थ राहिले होते.

ड यादीत त्यांचा समावेश करून लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने डॉक्टर हिना गावित यांचा पाठपुरावा सुरू होता त्याला नुकतेच यश प्राप्त झाले आहे. याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, ड यादीच्या माध्यमातून 2021 ते 2022 या वर्षातील धुळे जिल्ह्यात 18140 घरकुले मंजूर करून दिली होती. त्यातील 15,316 घरकुल उभारून पूर्ण झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात 2021 ते 2022 या वर्षातील 18,876 घरकुलांना मंजुरी मिळाली. यातील प्रत्यक्षात 15899 घरकुल आतापर्यंत उभी राहिली असून अन्य प्रगतीपथावर आहेत.

2024 ते 25 च्या ड यादी ला सुद्धा मंजुरी मिळाली असून त्यात धुळे जिल्ह्यातील 28 हजार 767 पैकी पंधरा हजार 225 घरकुलांना मंजुरी मिळाली तर नंदुरबार जिल्ह्यातील 36 हजार 960 पैकी 16128 घरकुल मंजूर झाले आहेत. 2024-25 च्या ड यादीत अक्कलकुवा तालुक्यातील 2897, अक्राणी तालुक्यातील 1523, नंदुरबार तालुक्यातील 3739, नवापूर तालुक्यातील 2170 शहादा तालुक्यातील 4228 आणि तळोदा तालुक्यातील 1693 घरकुलांचा समावेश आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रा. डी.सी.पाटील यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी निवड

Next Post

वराहाचे मांस खाणे तूर्त बंद करा; ‘आफ्रिकन स्वाईन’ संदर्भाने जि प अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांचे आवाहन

Next Post
वराहाचे मांस खाणे तूर्त बंद करा; ‘आफ्रिकन स्वाईन’ संदर्भाने जि प अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांचे आवाहन

वराहाचे मांस खाणे तूर्त बंद करा; 'आफ्रिकन स्वाईन' संदर्भाने जि प अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add