Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वराहाचे मांस खाणे तूर्त बंद करा; ‘आफ्रिकन स्वाईन’ संदर्भाने जि प अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांचे आवाहन

team by team
September 21, 2024
in राजकीय
0
वराहाचे मांस खाणे तूर्त बंद करा; ‘आफ्रिकन स्वाईन’ संदर्भाने जि प अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी

तालुक्यातील आष्टे गावात वराहांचे मृत्यू आफ्रिकन स्वाईन फिवरनेच झालेत; यावर भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीज म्हणजे प्राणी रोग अन्वेषण प्रयोग शाळेने शिक्कामोर्तब केले आहे. हा रोग जलद गतीने पसरणारा असल्यामुळे आपल्या जीवाची आणि इतरांची सुरक्षा म्हणून कोणीही वराहाचे म्हणजे डुकरांचे मांस खाऊ नये तसेच योग्य अंतर राखून सार्वजनिक आरोग्य राखावे; असे आवाहन नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी केले आहे.

जारी केलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी याविषयी जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, तालुक्यातील आष्टे गावात वराहांचे मृत्यू आफ्रिकन स्वाईन फिवरनेच झालेत; यावर भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीज म्हणजे प्राणी रोग अन्वेषण प्रयोग शाळेने शिक्कामोर्तब केले आहे. सदर रोग जलदगतीने पसरणारा अधिसुचित रोग असल्याचे दिसून आलेले आहे.

 

जिल्हयामध्ये आफ्रिकन स्वाईन या रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी संबंधीत विभागांना उपयायोजना करण्याची सूचना करताना स्पष्ट सांगितले आहे की बाधित क्षेत्राच्या 1 किमी परिसरातील सर्व वराहांचे कलींग करुन त्यांची विल्हेवाट शास्त्रीय पध्दतीने लावून त्या परिसराचे निजंतुकीकरण करावे.

 

डॉक्टर सुप्रिया गावित यांनी पुढे म्हटले आहे की, हे सर्व लक्षात घेता शहरी आणि ग्रामीण आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत यंत्रणेपासून सर्वांनीच दक्षता बाळगणे अत्यावश्यक आहे. त्यात सुयोग्य जैवसुरक्षा उपाययोजना करणे, पाळीव तसेच जंगली वराहातील अनियमित मर्तुकीवर बारकाईने लक्ष ठेवणे, स्थानिक पशुवैद्यकांनी नियमितपणे भेटी देवून नियंत्रण ठेवणे, आदी उपाय आवश्यक आहेत. तथापि निरोगी वराहाचे घरगुती व कत्तलखान्यातील कच्चे मांस उपपदार्थ तसेच कचरा यांच्याशी संपर्क येवू देवू नये, असेही डॉक्टर सुप्रिया गावित यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

डॉ.हिना गावित यांच्या पाठपुराव्यामुळे ड यादीतील 68 हजार 496 जणांना घरकुलांचा होणार लाभ

Next Post

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे प्रधानमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

Next Post
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे प्रधानमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे प्रधानमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add