नंदुरबार l प्रतिनधी
सातपुड्याच्या दुर्गम भागात बँक संदर्भात अनेक अडचणी असुन अडचणी सोडविण्यासाठी खासदार ऍड गोवाल पाडवी आणि आमदार ऍड के सी पाडवी यांनी धडगाव स्टेट बँक ला भेट देऊन अडचणी समजून घेत सोडविण्याचे आश्वासन दिले. या वेळी त्यांनी धडगाव शहारत व्यापारी आणि नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या.
धडगाव येथील कॉंग्रेस कार्यालयात माजी मंत्री आमदार के सी पाडवी आणि खासदार गोवाल पाडवी यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेत सवांद साधला. आगामी विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी चर्चा करण्यात आल्या.या वेळी कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा सूचना करण्यात आल्या.यावेळी धडगाव तालुक्यातील सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक उपस्थित होते. खासदार गोवाल पाडवी यांनी दिवस भर धडगाव तालुका कॉंग्रेस कार्यालयात थांबून नागरिकांच्या समस्या जाऊन घेतल्या.
बाजारात व्यापारी आणि नागरिकांसोबत संवाद
खासदार गोवाल पाडवी यांनी धडगाव येथील बाजार पेठेत आलेल्या नागरिकांच्या सोबत संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली.यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांसोबत चर्चा करत त्यांच्या समस्या जानून घेत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी वर बोलणे करून या कडे लक्ष घालण्याचे आदेश दिले.
बँक आणि ग्राहक सेवा केंद्राना दिल्यात भेटी
नागरिकांनी बँक आणि सेवा केंद्रावर येणाऱ्या आडचणी खासदार गोवाल पाडवी यांना सांगितल्या नंतर त्यांनी धडगाव स्टेट बँकला भेट दिली यावेळी त्यांनी त्याठिकाणी बँकेत आलेल्या नागरिकांच्या सोबत चर्चा केली सातपुड्याचा दुर्गम भागात बँकांचे जाळे वाढविण्यासाठी प्रयत्न करत असुन आजून नवीन बँक संदर्भात दिल्ली येथे पत्र व्यवहार केला असुन लवकरच या भागातील बँकाचे प्रश्न मार्गी लागतील असे आश्वासन दिले बँक कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
खासदार दिवस भर धडगाव येथे कॉंग्रेस कार्यालयात बसून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत होते.त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संबधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना करत होते तर कधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना करत होते.अनेक प्रश्न जागीच मार्गी लागत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केल.जेष्ठ नेते माजी मंत्री आमदार के.सी. पाडवी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत या भागात दिलेल्या रुग्ण वाहिका सुस्थितीत ठेवण्याचे आदेश दिले.यावेळी कॉंग्रेस चे पदधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते