तळोदा । प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील पुरूष व महिला तसेच तरूण कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला.
चिनोदा शहादा-तळोदा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी, पं.स.सभापती यशवंत ठाकरे, माजी सभापती सतिष वळवी, स्वीय सहाय्यक विरसिंग पाडवी, विठ्ठल बागले यांच्या उपस्थितीत तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील माजी उसरपंच भास्कर नथ्थू मराठे, अमृत गोमा पाडवी, ईश्वर भिवसन खैरनार, मोहन भटुलाल पटेल, शरद बन्सीलाल पटेल, राकेश बबन पाटील, भूषण शांताराम मराठे, योगेश रमणलाल पटेल, सतिष माधवराव मराठे, भूषण मनोहर पाटील, योगेश भिक्कन मराठे, दिपक सुरेश पाटील, समाधान परशुराम मराठे, मधुकर दिलीप वळवी, राजेंद्र बंडू मराठे, मंगेश प्रल्हाद राजपूत, रमण सुदाम पटेल, हेमंत उध्दव मराठे, विलास त्र्यंबकराव मराठे, भटु राजू पाटील, सतिष बबनराव मराठे, जगन मोहन मराठे, रमेश वेडू मराठे, उध्दव ओकांर मराठे, प्रकाश आनंदा मराठे, तुकाराम होमा पाडवी, गणेश एकनाथ मराठे, संजय वासुदेव मराठे, सुरेश अर्जुनराव मराठे, गजेंद्र रघुनाथ मराठे, सुपडू रघुनाथ मराठे, छगन सिंगा पाडवी, रमण नानसिंग पाडवी, भिमा काठ्या पाडवी, बबन रोहिदास पाडवी, धर्मी रविंद्र वळवी, चंदन नवनाथ पाडवी, अनिता मधुकर वळवी, कुसुमबाई सिताराम पाडवी, ईमलु सुदाम पाडवी असे ४० कार्यकर्त्यांनी आ.राजेश पाडवी यांच्या मतदार संघातील विकास कामांनी प्रभावित होऊन भारतीय जनता पार्टीत चिनोदा येथे आयोजित कार्यक्रमात जाहीर पक्ष प्रवेश केला.
यावेळी प्रवेश करणार्या कार्यकर्त्यांनी गावातील समस्या मांडल्या असता आ.राजेश पाडवी यांनी सर्व समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन यावेळी दिले. याप्रसंगी पं.स. सभापती यशवंत ठाकरे, माजी सभापती सतिष वळवी, स्वीय सहायक विरसिंग पाडवी, विठ्ठल बागले, सतिष कुवर आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.