Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव तालुक्यातील सरपंचांचे भर पावसात मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन

team by team
July 8, 2024
in राजकीय
0
धडगाव तालुक्यातील सरपंचांचे भर पावसात मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी पाड्यांचा विकास जलद गतीने व्हावा यासाठी दीड वर्षांपूर्वी 52 ग्रामपंचायतींचे विभाजन होऊन महसूल दर्जा देण्यात आला. मात्र त्यांना ऑनलाईन प्रणालीतील विलेज कोड मिळाला नसल्याने दीड वर्षापासून या गावांना कुठलाही निधी मिळत नाही. त्यामुळे संतप्त झालेले 52 गावाचे सरपंच तसेच नागरिक मुंबई येथील आझाद मैदानावर भर पावसात आंदोलन केले.

जिल्हाभरात दोन वर्षांपूर्वी ४४ नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आली आहे. यातील १४ ग्रामपंचायतींचे विभाजन करण्यात आले आहे. नवीन ग्रामपंचायत येथील महसूल गावाचे व्हिलेज कोड एल जी टी पोर्टलवर वॅलेट झाले नाही त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 15 वित्त आयोगपीएफएमएस प्रणाली, जीपीडीपी प्रणाली, ऑनलाइन दाखले प्रणाली, ग्रामपंचायत कर्मचारी प्रणाली तसेच अनेक ‘ई’ प्रणालींमध्ये या ग्रामपंचायती उपलब्ध नसल्यामुळे दीड वर्षापासून गाव विकासाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते गावातील विकास कामांना ब्रेक लागला असून पायाभूत सुविधेसाठी खर्चही करण्यात येत नाही त्यामुळे नागरिकांच्या मोठ्या रोष पदाधिकाऱ्यांना झेलावा लागतो.

जिल्ह्यातील 52 ग्रामपंचायतीच्या विभाजनानंतर निवडणुका झाल्या त्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच निवडून आले. मात्र दीड वर्षे उलटले तरीही गावाच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी एक रुपयाही खर्च करता येत नाही अशी समस्या निर्माण झाल्याने नागरिकांच्या मोठ्या रोषाला सरपंच तसेच ग्रामसेवक यांना सामोरे जावे लागत होते.

नागरिक त्यांना धारेवर धरत होते. अनेकदा निवेदन देऊनही कुठली दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या 52 गावातील सरपंचांनी मुंबई येथे आंदोलनाचा निर्णय घेतला. अखेर सरपंच परिषदेतर्फे एकत्र होत 52 गावातील सरपंच तसेच नागरिक मोठ्या संख्येने मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलनासाठी काल 7 जुलै रोजी सायंकाळी रवाना झाले.

मुंबई येथे धडगाव तालुक्याचे सरपंचांनी मुंबईत भर पावसात रस्त्यावर उतरून आंदोलन केले.सरपंच परिषदेचा आंदोलनाचा आजचा पहिला दिवस होता.जो पर्यंत ग्रामपंचायत निधी खर्च करण्याची परवानगी मिळत नाही तो पर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याची माहिती सरपंच परिषदेने दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

श्री जगन्नाथ रथयात्रेत सहभागी व्हा, इस्कॉन नंदुरबारचे आवाहन

Next Post

शासनाला जागी करण्यासाठी आदिवासी समाजातर्फे तूर वाद्य वाजवून निषेध

Next Post
शासनाला जागी करण्यासाठी आदिवासी समाजातर्फे तूर वाद्य वाजवून निषेध

शासनाला जागी करण्यासाठी आदिवासी समाजातर्फे तूर वाद्य वाजवून निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026
नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

April 1, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

April 1, 2026
तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add