शहादा l
येथे मराठा समाज युवा पर्वतर्फे घेण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी ह.भ.प संजय जमादार म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती हा वाचनाने व परिश्रमामुळेच मोठा होतो विद्यार्थ्यांकडे ज्ञानाचा भांडार असला की ते साता समुद्रापार जाऊ शकता असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी नंदुरबार जिल्हाभरातील शेकडो विद्यार्थी- विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती मातेचे प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. शहादा तालुका मराठा युवा पर्वच्या वतीने दहावी-बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात मोठ्या पदांवर व देशाबाहेर गेलेल्या व्यक्तींचा आणि त्यांच्या आई-वडिलांचा तसेच समाजासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार शहरातील अन्नपूर्णा लॉन्समध्ये दि. 23 जून रोजी उत्साहात पार पडला.
अध्यक्षस्थानी जिजामाता शिक्षण संस्थेचे सचिव आता राष्ट्रवादीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक संतोष साळुंखे, हभप संजय जमादार, उद्योजक आनंदराव चौथे, राजेश जाधव, प्रा.ज्ञानेश्वर सोनवणे, पांडुरंग गोरे, प्रा.संभाजीराव काळे,शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भुवनेश मराठे, संजय गायकवाड, युवराज जाधव, शांतीलाल गायकवाड, नवनीत शिंदे, माजी नगराध्यक्ष रवींद्र पवार, डॉ.शिरीष परांडे, हरीश हराळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रस्तावना चंद्रकांत बोराणे केली. याप्रसंगी जिजामाता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.अभिजीत मोरे, प्रा. ज्ञानेश्वर सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण कदम, राजेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश तट्टे यांनी केले तर आभार सागर मराठे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा युवा पर्वच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर पालक आदी उपस्थित होते.