Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आरोग्य विमा पॉलिसी काढल्यानंतर कोरोना काळात उपचार खर्च नाकारणाऱ्या स्टार हेल्थ विमा कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका

team by team
June 24, 2024
in क्राईम
0
आरोग्य विमा पॉलिसी काढल्यानंतर कोरोना काळात उपचार खर्च नाकारणाऱ्या स्टार हेल्थ विमा कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका

नंदुरबार  l  प्रतिनिधी

स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनी कडून आरोग्य विमा पॉलिसी नंदुरबार व खांडबारा येथील रहिवासांनी काढला होता. कोरोना काळात त्यांना कोरोना झाल्यानंतर त्यांनी कंपनीकडे उपचार करता लागणारा खर्च कंपनीकडे मागणी केली कंपनीने उपचाराचा खर्च देण्याचे नाकारले. या रहिवाशांनी नंदुरबार येथील ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रार दाखल केल्यानंतर ग्राहक मंचाने संबंधित कंपनीला दणका देत. ग्राहकांना खर्चासह भरपाई देण्याचे आदेश दिले.

नंदुरबार येथील रहिवासी उमेश भगवानसिंग राजपूत यांनी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडून आरोग्य विमा पॉलिसी काढलेली होती. सदर पॉलिसीच्या कालावधीत तक्रारदार यांना कोरोना आजार झाला. उपचाराकरता त्यांना लागणाऱ्या खर्चाची मागणी ज्यावेळी त्यांनी विमा कंपनीकडे केली तेव्हा विमा कंपनीने सदरहू खर्चाची रक्कम देण्याचे नाकारले. सबब उमेश राजपूत यांनी नंदुरबार ग्राहक आयोग येथे विमा कंपनी तक्रार दाखल केली.

दाखल तक्रार, इतर कागदपत्र, तज्ञ वकिलांचा युक्तिवाद तसेच दाखल न्यायनिवाडे या सर्वांचे सखोल अवलोकन करून  ग्राहक आयोगाचे अध्यक्ष डी. एस. प्रसन्ना, मोहन एस बोडस, श्रीमती एस. एस. पवार यांनी सदरची तक्रार मंजूर करून विमा कंपनीने तक्रारदार यांना उपचाराच्या खर्चाची रक्कम एक लाख 19 हजार 749 रुपये व शारीरिक व मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये व तक्रार अर्जाचा खर्च 5000 रुपये तसेच दि. 25 ऑक्टोबर 2021 पासून 45 दिवसात नऊ टक्के व्याजदराने संपूर्ण रक्कम तक्रारदारास देऊन होईपर्यंत ग्राहक आयोगाने पारित केला आहे.

दुसऱ्या घटनेत नवापूर तालुक्यातील  खांडबारा येथील रहिवासी नंदकिशोर जगन्नाथ अग्रवाल व सीताबाई नंदकिशोर अग्रवाल या व्यापारी दाम्पत्यांनी स्टार हेल्थ एंड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांचे कडून कोरोना कवच ही पॉलिसी काढलेली होती सदर पॉलिसीच्या कालावधीत नंदकिशोर अग्रवाल यांना कोविड -19 आजार  झाला. उपचाराकरिता त्यांना लागलेल्या खर्चाची मागणी ज्यावेळी त्यांनी विमा कंपनीकडे केली तेव्हा विमा कंपनीने सदरहू खर्चाची रक्कम देण्याचे नाकारले.

अखेर व्यापारी नंदकिशोर अग्रवाल यांनी नंदुरबार ग्राहक आयोग यांचे विमा कंपनीविरुद्ध ॲड. निलेश देसाई यांचे मार्फत तक्रार दाखल केली. दाखल तक्रार शपथपत्र इतर कागदपत्र वकिलांचा युक्तिवाद तसेच दाखल न्यायनिवाडे या सर्वांचे सखोल अवलंबून करून ग्राहक आयोगाचे अध्यक्ष डीएम प्रसन्ना तसेच सदस्य  मोहन येसबोडस श्रीमती एस एस पवार यांनी सदरची तक्रार मंजूर करून विमा कंपनीने तक्रारदार यांना उपचाराच्या खर्चाची रक्कम  एक लाख आठ हजार 586 रुपये तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये व तक्रार अर्जाचा खर्च 5000 रुपये दिनांक 18 डिसेंबर 2020 पासून 45 दिवसात नऊ टक्के व्याजदराने संपूर्ण रक्कम तक्रारदारास द्यावी असा आदेश पारित केला.

बातमी शेअर करा
Previous Post

शिक्षक मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे

Next Post

विद्यार्थ्यांकडे ज्ञानाचा भांडार असला की ते साता समुद्रा पार जाऊ शकतात-ह.भ.प संजय जमादार

Next Post
विद्यार्थ्यांकडे ज्ञानाचा भांडार असला की ते साता समुद्रा पार जाऊ शकतात-ह.भ.प संजय जमादार

विद्यार्थ्यांकडे ज्ञानाचा भांडार असला की ते साता समुद्रा पार जाऊ शकतात-ह.भ.प संजय जमादार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add