नंदुरबार l प्रतिनिधी
काकेश्वर विद्या प्रसारक संस्था भालेर संचलित श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भालेर व माध्यमिक विद्यालय खोक्राळे येथील सेवानिवृत्ती सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
विद्यालयातील वरिष्ठ लिपिक दिनेश माधवराव पाटील व शिपाई रविंद्र हरी बागुल तसेच माध्यमिक विद्यालय खोक्राळे येथील शिपाई विकास भटा बागुल हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून चे शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी अहिरे यांच्या हस्ते शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला व त्यांनी कर्मचाऱ्यांचे भावी आयुष्य निरोगी व आनंददायी जावे याबद्दल शुभेच्छा दिल्यात.शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेच्या विकासाबद्दल व विद्यालयात करण्यात येत असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान बदलाबाबत सर्वांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्यात.यावेळी दिनेश पाटील व रविंद्र बागुल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आपल्या संपूर्ण सेवेतील आलेले अनुभव कथन केलेत.
सेवेतील कार्यात संस्थेने व विद्यालयाने दिलेल्या प्रेमाबद्दल अनुभव कथन करताना कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले.
यावेळी प्राचार्या सौ. विद्या चव्हाण, मुख्याध्यापक एस जी सैंदाणे,शिक्षक पी. एस. सूर्यवंशी यांनी कर्मचाऱ्यांच्या सेवाकार्याचे विशेष कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात पाटील यांनी संस्थेची सुरुवात कशा बिकट परिस्थितीत झाली. हे सांगितले.कार्यक्रमास प्राचार्या, मुख्याध्यापक , पर्यवेक्षक व सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.व्ही.ईशी यांनी केले.