Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी संबंधितांवर कारवाई करावी : भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील

team by team
May 30, 2024
in राजकीय
0
मतदार यादी सुधारणा करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयासह निवडणूक आयोगाने योग्य कार्यवाही करावी : भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील

नंदुरबार l प्रतिनिधी

शहादा शहर व पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीच्या घटना, वाहतुक व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्थेबाबत दखल घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.

 

पोलिस निरीक्षक शिवाजीराव बुधवंत यांना प्रा.मकरंद पाटील यांनी दिलेल्या लेखी पत्राचा आशय असा,शहादा शहर व पोलीस स्टेशनच्या हद्दीत गत काही दिवसांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. याबाबत सर्वसामान्य जनतेकडून नाराजी व्यक्त केली जात असून या घटनांना पायबंद घालावा यासाठी जनप्रतिनिधी म्हणून आपणास पत्र लिहित आहे.शहादा शहरातील खाजगी तसेच शासकीय मालमत्तेची चोरी करून काही जण भंगार विक्रेत्यांकडे वस्तू विक्री करतात.

 

आपण याची दखल घेऊन चोरीच्या वस्तू खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचा शोध घेऊन कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे.पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेत शिवारातील इलेक्ट्रिक मोटारी, शेती पूरक साहित्य तसेच शेतमालाच्या चोरीच्या घटना घडत आहेत. याबाबत तक्रार दाखल करूनही चौकशी होत नसल्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे.

 

 

सद्यस्थितीत शहरातील वाहतुक व्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. एकेरी मार्गाचा अवलंब न करणे,नो पार्किंग झोनमध्ये वाहन उभे करणे, अवजड वाहने मेनरोडवरून नेणे, व्यावसायिक लॉरीधारकांचे मुख्य रस्ते व चौकातील अतिक्रमण, जुनी तहसिल कचेरी ते भाजी मंडई पर्यंतच्या फुटपाथवरील अतिक्रमण इत्यादींबाबत दखल घेऊन वाहतुकीचे नियमन करण्यासाठी स्वतंत्र पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था व्हावी.चोरीच्या घटना, वाहतुकीची कोंडी, अवैध व्यवसाय यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असून शहरातील सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात येऊन जनहितासाठी संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रा.पाटील यांनी लेखी पत्राद्वारे केली असून तहसीलदार शहादा यांना पत्राची प्रत पाठवली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

क.पू. पाटील उच्च माध्यमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालयातील कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

Next Post

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उभाठा पक्षाचे निवेदन

Next Post
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उभाठा पक्षाचे निवेदन

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उभाठा पक्षाचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026
मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add