नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार नगर परिषद प्लास्टीक बंदी कामी 60 किलो प्लास्टीक वाळगणाऱ्या व्यापारीकडे रक्कम 15 हजार रुपये दंडात्मक वसुली करण्यात आली.
नंदुरबार नगर परिषद आरोग्य विभागाने शहरातील होलसेल व्यापान्यांकडे नंदुरबार नगरपरिषद स्वच्छता विभागाकडील यांच्या पथका खालील प्लास्टीक जप्तीची कार्यवाही केली.
एकूण 60 किलो प्लास्टीक त्याअर्थी, संपूर्ण राज्यामध्ये प्लास्टीक पासून बनविल्या जाणान्या पिशव्या (Carry Bags) तसेच प्लास्टिक / थर्माकॉलपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तु उदा. ताट, कप्स, प्लेट्स, ग्लास, काटे, बाटो, चमचे, फ्लेक्स, नॉन बोक्न पॉलिप्रॉपीलेन बॅग्स (Non-Woven Polypropylene bags), बॅनर्स, तोरण, ध्वज, प्लास्टीक शिट्स, सर्व प्रकारचे प्लास्टीक वेष्टन इत्यादींच्या उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, विक्री करण्यास लवकरच राज्यात निबंध (बंदी) घालण्याचे प्रयोजन आहे. यामध्ये किरकोळ विक्रीसाठी अन्य वस्तुंच्या पॅकेजींगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीक व प्लास्टीक शिटचा समावेश आहे.
तसेच होलसेल विक्रेते रवि एन्टरप्राईजेस जय अम्बे प्लास्टीक यांच्या कडून 60 किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले व त्यांच्याकडून रु.15 हजार दंडाची रक्कम वसूल करण्यात आली.
याकामी नंदुरबार नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियंता विशाल कामडी, सैनेटरी इन्सपेक्टर युवराज चव्हाण रविंद्र काटे, व आरोग्य कर्मचारी मनोहर पिंपळे, योगेश पाटोळे,
रमेश निकम, विक्रम कोली, आरीफ शें. कुरेशी, श्रावण पाटील इ. पथकाद्वारे कार्यवाही करण्यात आली आहे. यापुढे शहरात प्लास्टीक विक्री करतांना किंवा वापर करतांना आढळून आल्यास त्यांचावर नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. प्लास्टीक प्रतिबंधक पथकाकडून यापुढेही कार्यवाही सुरु राहील, तरी व्यापाऱ्यांनी व नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.