नंदुरबार l प्रतिनिधी
जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव करीत शनिमांडळ गावात 27 एप्रिल 2024 रोजी रात्री साडेआठ वाजता महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांचे अद्भुत जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि शनि मांडळच्या प्रमुख रस्त्यांवरून डॉ. हिना गावित यांच्यासह गावित परिवाराचे सवाद्य मिरवणूक करण्यात आली.
नंदुरबारचे ग्रामदैवत श्री गणपती मंदिरात 27 एप्रिल 2024 रोजी सकाळी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. हिना गावित यांनी नारळ वाढवून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्याचप्रमाणे रात्री साडेआठ वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध शनिमांडळ येथील शनी मंदिरात जाऊन विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली.
शनि देवाच्या चरणी नारळ वाढवून त्यांनी प्रचार सभांचा प्रारंभ केला. याप्रसंगी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉ. विजयकुमार गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित, भारतीय जनता पार्टीचे आमदार राजेश पाडवी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. कुमुदिनी गावित, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र राजपूत, भाजपाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, शनिमांडळ येथील मुन्ना पाटील, कोपरली चे सरपंच श्री.वानखेडे आणि त्या भागातील महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत न भूतो न भविष्यती असा जल्लोष दिसून आला.
शनिमांडळ तलवाडे, रनाळे, वावद यासह भोवतालच्या गावातील ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले दिसले.