नंदुरबार | प्रतिनिधी
लखीमपुर येथील घटनेच्या दोर्षींवर कारवाई करावी, केंद्रीय राज्यमंत्री यांची तात्काळ मंत्रीमंडळ तून हाकलपट्टी करावी आदी मागण्यांसाठी प्रहार शेतकरी संघटनेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देण्यात आले
या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथे केंद्रीय गृहराज्य मंत्री यांनी केलेल्या शेतकर्यांविषयींच्या बेताल वक्तव्याबास्त शेतकरी मंत्री महोदय जाणार असलेल्या मार्गावर शांततेने आंदोलन करुन बेताल वक्तव्य चा निषेध करत होते. त्याचवेळेस केंद्रीय मंत्री यांचा मुलगा व काही कार्यकर्ते यांनी शेतकन्यांच्या शांततेत सुरु असलेल्या सांदोलनात आपल्या भरधाव चारचाकी वाहनाने शेतकर्यांच्या अंगावर अमानुष हल्ला करून पार ते पाच शेतीबांधवांचा सुडबुद्धीने जीव घेतला आहे. जे शेतकरी शांततेच्या मार्गाने गेल्या दहा महिन्यांपासून दिल्लीच्या दरबारी आपले आंदोलन करीत आहेत, त्या शेतकन्यांना केंद्र शासनाच्या जबाबदार मंत्रांनी आतकवाद खन्तिस्ताना, नक्षलवादा अस समजून केद्रसरकारन भारतातील अन्नदात्वाच एकप्रकारखाच अवहेलना केली आहे. वरील घटनेत जबाबदार असलेले केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा याची तात्काळ मंत्रीमंडळ तून हाकलपट्टी करून शेतकरंयांच्या खुनींना तात्काळ अटक करावी, अन्यथा उत्तर प्रदेशातील शेतकर्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातीलच काय संपूर्ण देशातील शेतकरी आता केंद्र सरकारच्या विरोधात उभे राहून अहिंसे या मार्गांनि भारतीय जनता पार्टीच्या आमदार, खासदार, मंत्र्यांना घेराव करून शेतकर्यांवर केलेल्या केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी व भाजपा व केंद्र सरकारने शेतकन्यांवर चालविलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील,रवींद्र वळवी,सावळीराम खरे,प्रताप पाटील,नवल पाटील यांच्या स्वाक्षर्या आहेत.