Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

निंबोणी येथे शाश्वत उघड़यावरिल हागणदारीमुक्त अभियानांतर्गत विविध उपक्रम

team by team
October 8, 2021
in सामाजिक
0

नंदुरबार | प्रतिनिधी-
तालुक्यातील निंबोणी ग्रामपंचायत अंतर्गत गाव हगणदारीमुक्तीबाबत शाश्वतता राहावी व वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेबाबत ग्रामस्थांमध्ये जाणीव जागृती व्हावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भारताच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने नंदुरबार तालुक्यात स्वच्छ  भारत मिशन ग्रामीण अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली  एन.एस.इ. फाउंडेशन, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने फिनिश सोसायटी या सामाजिक संस्थेच्या वतीने निंबोणी येथे शाश्वत उघड्यावरील हागणदारी मुक्तीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा  गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करून गावात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शौचालयाचा नियमित वापर, सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन या विषयाला  अनुसरून गावफेरी काढण्यात आली. तसेच सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत गावात तयार करण्यात आलेल्या शोष खड्ड्यांची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती पवार यांनी फिनीश सोसायटीच्या वतीने शाश्वत उघड्यावरील हागणदारीमुक्त अभियानांतर्गत केलेल्या कामाची पाहणी केली. जिल्हा परिषद शाळा निंबोणी येथे हँडवॉश स्टेशन व मुलींसाठी शौचालय व मुतारी या बांधकामाची पाहणी केली. गावातील व शाळेतील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच हागणदारी मुक्तीचे फायदे आणि तोटे यावर मार्गदर्शन करण्यात आले. यात  पुरुषांना व महिलांना शौचालय वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी सहायक गट विकास अधिकारी श्रीमती पवार, पंचायत समिती नंदुरबार, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री.निकुंभे, कोठली जिल्हा परिषदे केंद्रशाळाप्रमुख एस.एम.पाटील,फिनिश सोसायटीच्या प्रकल्प व्यवस्थापक आकांक्षा बोरकर, बीसीसी अधिकारी मंगेश निकम, प्रकल्प अधिकारी निशांक गजभिये,प्रकल्प सहायक वैभव खांडवी, राकेश गुरव,सुनीता भोये, किशोरी ठकार,दारासिंग पावरा, निलेश पगारे, सचिन साळुंके, मारोती चिमणकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नितीन महानुभाव यांनी केले. ग्रामपंचायत निंबोणी, सरपंच, ग्रामसेवक व जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक व शिक्षक  तसेच ग्रामस्थ निंबोणी यांचे विशेष सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हे

Next Post

सर्वपित्री अमावस्येला अंनिसचा स्मशान सहल उपक्रम

Next Post
सर्वपित्री अमावस्येला अंनिसचा स्मशान सहल उपक्रम

सर्वपित्री अमावस्येला अंनिसचा स्मशान सहल उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add