Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अवैध दारूच्या वाहतूकीवर नंदुरबार पोलीसांची धडक कारवाई केली असून 18 लाखांचा मद्यसाठा जप्त

team by team
April 2, 2024
in क्राईम
0
अवैध दारूच्या वाहतूकीवर नंदुरबार पोलीसांची धडक कारवाई केली असून 18 लाखांचा मद्यसाठा जप्त

नंदुरबार l प्रतिनिधी
अवैध दारूच्या वाहतूकीवर नंदुरबार पोलीसांची धडक कारवाई केली असून 18 लाख 38 हजार 560 रुपये किमतीची दारु जप्त केली आहे.

 

 

 

 

“जिल्हयात पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी अवैध धंदयावर धडक कारवाई सुरू केल्यापासून अवैध धंदे करणा-यांचे धाबे चांगलेच दणाणले असून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी स्वतःचे मोबाईल क्रमांक जनतेसाठी सार्वजनिक केल्याने त्यांना नंदुरबार वासियांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणूक व सण उत्सावाचे अनुषंगाने जिल्हयात व जिल्हयाबाहेर अवैधपणे दारुची वाहतूक होणार नाही तसेच अवैध दारुची तस्करी करणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करणेबाबत पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते.

 

 

 

त्याअन्वये दिनांक 01/04/2024 रोजी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, महाराष्ट्रातून नवापूर मार्गे गुजरात राज्यात अवैधरित्या देशी विदेशी दारु चोरटी वाहतूक करुन विक्रीसाठी जाणार असलेबाबत माहीती मिळाली. त्यावरून पोलीस अधीक्षक यांनी सदर माहितीचे आधारे स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी यांना माहिती दिली व त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे व नवापूर पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करुन बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी तात्काळ रवाना केले. मिळालेल्या बातमीच्या आधारे नवापूर तालुक्यातील बेडकी नाका येथे असलेल्या आंतरराज्य सिमा तपासणी नाकाबंदीचे ठिकाणी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलीसांनी सापळा रचला व मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे एक पांढ-या रंगाचे अशोक लेलैंड कंपनीचे चारचाकी वाहन त्यामध्ये टमाटयाने भरलेले प्लास्टीकचे कॅरेट व वांग्यांनी भरलेल्या प्लास्टीकच्या पिशव्या ठेवलेल्या दिसत असलेल्या वाहनास थांबवून तपासणी केली असता

 

 

 

 

 

सदर वाहनामध्ये भाजीपाला असलेल्या कॅरेट व पिशव्यांचे खाली विदेशी दारुचे खोके लपवून अवैधरित्या गुजरात राज्यात चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने विनापरवाना वाहतूक करतांना मिळून आले. सदर वाहनावरील चालकास विश्वासात घेऊन अधिकची विचारपूस करता त्याने सदरचा माल हा त्याचे साथीदारांसह धुळे जिल्हयातील साक्री तालुक्यातील कळंबिर गावाचे शिवारातील एका पडीक शेतातून भरुन एका पांढ-या रंगाच्या महिंद्रा बोलेरो वाहनातून अवैधरित्या विक्री करण्याचे उद्देशाने घेऊन जात असल्याचे सांगितले. त्याअन्वये नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी त्यांचे स्टाफसह व स्थानिक गुन्हे शाखेचे किरणकुमार खेडकर यांचे पथक अशांनी पकडण्यात आलेल्या आरोपीचे साथीदारांना लागलीच ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस करुन तात्काळ धुळे जिल्हयातील साक्री तालुकयातील कळंबीर गावाचे शिवारातील एका पडीक शेतातून सदरचा अवैध विदेशी दारुचा साठा कायदेशीर प्रक्रीया करुन जप्त केला व आरोपींना ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडुन एकुण 196 खोके असा एकुण 18 लाख 38 हजार 560 रुपये किमतीची विदेशी दारु अवैधरित्या बाळगून त्याची चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने घेऊन जात असतांना त्यांच्या मूसक्या आवळल्या. तसेच सदर आरोपींकडुन दारुची चोरटी वाहतूक करणेसाठी वापरण्यात आलेली वाहने देखील जप्त करण्यात आले आहेत.

 

 

 

त्याअन्वये नवापूर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 253/2024 महा. दारुबंदी अधिनियम कलम 65 (ई), 83, 108 अन्वये आरोपी क्रमांक 1) महेंद्र उर्फ राहूल राजेंद्र मराठे रा. उधना, गुजरात 2) सागर आबा भदाणे रा. सुरत, गुजरात 3) हरिष गोविंदा देविकर रा. सुरत, गुजरात 4) मोहनेश उर्फ गोकूळ प्रभाकर चित्ते रा. साक्री जि धुळे 5) युवराज राजेंद्र जाधव रा. साक्री जि धुळे 6) राकेश तानाजी ठाकरे रा.साक्री जि धुळे 7) सचिन सुनिल न्याहाळदे रा. जैताणे ता साक्री जि धुळे अशांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, व स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलीस ठाण्याचे पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रनायक हे हिंदुस्थान चे विद्यापीठ- राजा महाराज यांचे गाथा वीर हिंदू योद्धांची कार्यक्रमात प्रतिपादन

Next Post

बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीत नागसेन पेंढारकर यांची नियुक्ती

Next Post
बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीत नागसेन पेंढारकर यांची नियुक्ती

बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीत नागसेन पेंढारकर यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add