Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रघुवंशी समाजाच्या वतीने अयोध्येत 2121 कुंडी श्रीराम महायज्ञ,माजी आ.चंद्रकांत रघुवंशींच्या सहभाग

team by team
February 9, 2024
in राजकीय
0
रघुवंशी समाजाच्या वतीने अयोध्येत 2121 कुंडी श्रीराम महायज्ञ,माजी आ.चंद्रकांत रघुवंशींच्या सहभाग

नंदुरबार l प्रतिनिधी
रघुवंशी समाजाच्या वतीने अयोध्येत 2121 कुंडी श्रीराम महायज्ञ होत आहे. १० ते १८ फेब्रुवारी पर्यंत सर्वात मोठा यज्ञ होत असून, देशभरातील समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती माजी आमदार तथा रघुवंशी समाजाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.

 

 

 

अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्या ठिकाणी समाजाच्या वतीने देशातील सर्वात मोठा श्रीराम महायज्ञाला १० फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी सपत्नीक यज्ञ पूजेत सहभागी होणार आहेत. पहिल्याच दिवशी 5100 राम भक्त 1100 कलशांसह कलश यात्रा काढणार आहेत.

 

 

 

या महायज्ञात रघुवंशी समाजाचे सुमारे 15 हजार भाविक सहभागी होणार असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, अयोध्येचे आमदार वेदप्रकाश गुप्ता या महायज्ञात सहभागी होणार आहेत. या सोहळ्याला भव्य स्वरूप देण्यासाठी सुमारे महिनाभर शरयू नदीचा काठावर ६० एकर जागेवर हवनकुंड आणि तंबूनगरी उभारली जात आहे.

 

 

 

महायज्ञाच्या भव्य विधी संत आत्मानंद दास महात्यागी नेपाळी बाबा यांच्या संयोगाने होत आहे. त्यासाठी 1008 नर्मदेश्वर शिवलिंगाची स्थापना करण्यात येणार आहे. 9 दिवस चालणाऱ्या या ऐतिहासिक महायज्ञात चित्रकूटचे जगतगुरु रामस्वरूप आचार्यजी महाराज यांच्याकडून संगीतमय रामकथाही सांगितली जाणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी विकास विभाग देणार जिल्ह्यात 27 हजार घरकुले : डॉ. विजयकुमार गावित

Next Post

शिक्षण सभापती गणेश पराडके यांच्या हस्ते शिंदवाणी केंद्रातील क्रीडास्पर्धांचे उदघाटन

Next Post
शिक्षण सभापती गणेश पराडके यांच्या हस्ते शिंदवाणी केंद्रातील क्रीडास्पर्धांचे उदघाटन

शिक्षण सभापती गणेश पराडके यांच्या हस्ते शिंदवाणी केंद्रातील क्रीडास्पर्धांचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

February 2, 2026
डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा जंबो स्वरूपात क्रीडा स्पर्धा होणार,विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे समस्त क्रीडापटूंना आवाहन

भारत बनतोय जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था : माजी खा.डॉक्टर हिना गावित

February 2, 2026
अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

February 2, 2026
नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

February 2, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

अजितदादांचा अस्थिकलश उद्या नंदुरबारात जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन

February 2, 2026
अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add