Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी विकास विभाग देणार जिल्ह्यात 27 हजार घरकुले : डॉ. विजयकुमार गावित

team by team
February 9, 2024
in राजकीय
0
आदिवासी विकास विभाग देणार जिल्ह्यात 27 हजार घरकुले : डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी विकास विभागाच्या वतीने राज्यात ९७ हजार घरकुले देण्याचा मानस असून त्यातील २७ हजार ५०० घरकुले एकट्या नंदुरबार जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली असून जिल्ह्यातील एकही पात्र व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहे.

धडगाव तालुक्यात विविध विकास कामांचे भूमीपूजन मंत्री डॉ. गावित यांच्या शुभहस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास सुभाष पावरा, रुपसिंग तडवी, रामा वळवी, हिरालाल पाडवी, रमेश तडवी, मंगेश तडवी, राजेंद्र तडवी, किशोर तडवी, शिवाजी पराडके, लतिष मोरे,चंदू वळवी व पंचक्रोशीतील अधिकारी, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, जिल्ह्यातील ६५ हजार घरांमध्ये वीज पोहचावी यासाठी ४०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील ५५ हजार घरकुलांना वीज दिली जाणार आहे. तसेच जलजीवन मिशन च्या माध्यमातून प्रत्येक घर आणि घरातील प्रत्येकाला पाणी दिले जाणार आहे. तसेच पाण्याची गुणवत्ता तपासून आवश्यक तेथे फिल्टरही बसवले जाणार आहे.

जलजीवन मिशन साठी वीजबिलाचा प्रश्न उद्भवणार नाही यासाठी सोलर प्लांटचीही तरतूद आराखड्यांमध्ये करण्यात आली आहे. धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील बहुतांश कुटुंबांचे आजोबा-पणजोबांच्या नावावर रेशन कार्ड असून त्यामुळे एखाद्या योजनेचा लाभ जर त्या कुटुंबातील आजोबा, पणजोबा ने घेतला असल्यास त्या कुटुंबातील कुणालाही त्या योजनेचा लाभ घेता येत नाही, त्यासाठी प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचे रेशन कार्ड स्वतंत्र बनवून घेणे गरजेचे आहे.

ते पुढे म्हणाले, दवाखाना, शाळा, आश्रमशाळा, ग्रामपंचायत, तालुक्याच्या ठिकाणी जोडणाऱ्या रस्त्यांची आवश्यकता लक्षात घेवून शासनाने आदिवासी दुर्गम भागासाठी बिरसा मुंडा जोडरस्ते योजना आणली असून येणाऱ्या काही दिवसात या योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे दुर्गम भागात आपल्याला पहावयास मिळणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

१ लाख ७० हजार हेक्टर मधील ‘हसदेव ‘ जंगलाची व्रुक्षतोड थांबवा,ट्रायबल फोरमचे राष्ट्रपती,पंतप्रधान यांना निवेदन

Next Post

रघुवंशी समाजाच्या वतीने अयोध्येत 2121 कुंडी श्रीराम महायज्ञ,माजी आ.चंद्रकांत रघुवंशींच्या सहभाग

Next Post
रघुवंशी समाजाच्या वतीने अयोध्येत 2121 कुंडी श्रीराम महायज्ञ,माजी आ.चंद्रकांत रघुवंशींच्या सहभाग

रघुवंशी समाजाच्या वतीने अयोध्येत 2121 कुंडी श्रीराम महायज्ञ,माजी आ.चंद्रकांत रघुवंशींच्या सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

March 27, 2026
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

March 27, 2026
रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित  शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

March 27, 2026
रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

March 27, 2026
आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add